शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ५ दिवसांत २३२ शस्त्रक्रियांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:24 IST

येथील ग्रामीण रुग्णालयाला मार्च अखेरपर्यंत ४१२ कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट दिले असून आत्तापर्यंत १८० शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालयाने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अजूनही २३२ शस्त्रक्रिया ५ दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान ग्रामीण रुग्णालय प्रशासनासमोर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): येथील ग्रामीण रुग्णालयाला मार्च अखेरपर्यंत ४१२ कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट दिले असून आत्तापर्यंत १८० शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालयाने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अजूनही २३२ शस्त्रक्रिया ५ दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान ग्रामीण रुग्णालय प्रशासनासमोर आहे.लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात आरोग्य विभागाला ग्रामीण आणि शहरी भागात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी ठराविक उद्दिष्ट देण्यात येते. ही बाब पूर्णत: ऐच्छिक असल्यामुळे या संदर्भात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येते. त्याच बरोबर आर्थिक लाभ व वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. मात्र तरी सुद्धा नागरिकांचा या शस्त्रक्रिया वेळेत करण्याकडे कल कमी असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे उद्दिष्ट देण्यात आले होते. ग्रामीण भागाला आरोग्य विभागाने दिलेले ३५१ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. उलट ४२७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीणमध्ये उद्दिष्टापेक्षा जास्त कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाल्या असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली. ग्रामीण रुग्णालयाला शहरासाठी ४१२ चे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा उजडला तरी ग्रामीण रुग्णालयामार्फत केवळ १८० कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. उद्दिष्ट पूर्ण करण्याची डेडलाईन ३१ मार्च असल्याने ५ दिवसांत उर्वरित २३२ शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालय कसे पूर्ण करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामीण रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाची शिबीर आयोजित करुन समाधानकारक आकडा गाठता न आल्याने याला रुग्णालय प्रशासन जबाबदार आणि उदासीन असल्याचे दिसून येत आहे. अलिकडच्या काळात पाळणा लांबविण्यासाठी इंजेक्शन, कॉपर टी व इतर साधनांचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध असल्याने अनेकजण कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील ग्रामीण भाग आघाडीवर४शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील आरोग्य विभागाची कामगिरी सरस असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्राथामिक आरोग्य केंद्र कोल्हांतर्गत १८४ कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते.४या ठिकाणी उद्दिष्टापेक्षा जास्तीच्या ७४ शस्त्रक्रिया अशा एकूण २६० शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील प्राथामिक आरोग्य केंद्र रामपुरींतर्गत १६७ चे उद्दिष्ट देण्यात आले होते. याठिकाणी १५८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.४त्यामुळे ग्रामीण भागात ३५१ चे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात मात्र ४२७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागच कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्याच्या बाबती आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.एका ही पुरुषावर शस्त्रक्रिया नाहीअनेकदा पुरुषी मानसिकतेतून स्त्रियांना डावलण्याचा प्रयत्न होतो. मात्र कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया स्त्रियांवरच लादल्या जातात. राजकीय क्षेत्रासह इतर क्षेत्रात महिलांच्या पुढे-पुढे करणारे पुरुष शस्त्रक्रियेच्या बाबतीत कारभारणीच्या मागे असल्याचे चित्र आहे. अलिकडच्या काळात तालुक्यात एकाही पुरुषावर शस्त्रक्रिया झाली नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकार