शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :अमृत अभियान योजनेचे कार्यारंभ आदेश रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:25 IST

अमृत अभियानांतर्गत परभणी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मंजूर झालेल्या योजनेच्या कामाच्या सुधारित मान्यतेस स्थायी समितीची मंजुरी घेतली नसल्याने या योजनेचे कंत्राटदाराला दिलेले कार्यारंभ आदेश रद्द करावेत, या मागणीसाठी मनपातील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बुधवारी मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची भेट घेतली व या संदर्भात संताप व्यक्त केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अमृत अभियानांतर्गत परभणी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मंजूर झालेल्या योजनेच्या कामाच्या सुधारित मान्यतेस स्थायी समितीची मंजुरी घेतली नसल्याने या योजनेचे कंत्राटदाराला दिलेले कार्यारंभ आदेश रद्द करावेत, या मागणीसाठी मनपातील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बुधवारी मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची भेट घेतली व या संदर्भात संताप व्यक्त केला़परभणी शहरासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली़ या योजनेच्या कामासाठी मागविण्यात आलेल्या निविदांमध्ये औरंगाबाद येथील विजय कन्स्ट्रक्शन व नांदेड येथील संतोष इन्फ्रा प्रा़ लि़ या दोन निविदाधारकांनी निविदा सादर केल्या होत्या़ त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या परभणी व नांदेड कार्यालयाने त्यांची तपासणी करून अंतीम मान्यतेसाठीचा प्रस्ताव मुंबई येथील सदस्य सचिवांकडे पाठविला होता़ त्यानुसार १८ जुलै २०१७ रोजी निविदेतील विजय कन्स्ट्रक्शन यांनी ९़९९ टक्के जास्त दराने निविदा भरली होती़ या प्रकरणी २८ आॅगस्ट २०१७ रोजी दर तडजोड करून स्थायी समितीपुढे प्रस्ताव ठेवण्यात आला़ त्यामध्ये ९़५० टक्के अंदाजपत्रकीय रक्कम जास्त दराने विजय कन्स्ट्रक्शनची निविदा स्वीकारण्याचा ठराव घेण्यात आला़ या कामाच्या निविदा स्वीकृतीस राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळविण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला़ त्यानुसार राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या २७ आॅक्टोबर २०१७ रोजी झालेल्या बैठकीत या योजनेच्या कामाच्या निविदेच्या किंमतीच्या ७़९९ टक्के अधिक दर असे कमी करून मनपा स्थायी समितीने या पाणीपुरवठा योजनेच्या निविदा स्वीकृतीच्या ठरावामध्ये सुधारणा करून मान्यता देण्यात यावी, असे नमूद करण्यात आले. १० नोव्हेंबर २०१७ रोजी नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी निलेश पोतदार यांच्या स्वाक्षरीनिशी याबाबत मनपाला याबाबतचे पत्र मिळाले़ अशा प्रकारची पूर्व कल्पना स्थायी समितीला न देता सरळ या कामाचे कार्यारंभ आदेश २७ नोव्हेंबर २०१७ रोजी देण्यात आले़ त्यामुळे १० नोव्हेंबर २०१७ रोजी कक्ष अधिकाºयांनी पाठविलेल्या पत्रानुसार स्थायी समितीच्या ठरावात सुधारणा न करताच दिलेले कार्यारंभ आदेश रद्द करावेत, या मागणीसाठी विरोधी पक्षनेते विजय जामकर, शिवसेनेचे गटनेते चंदू शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते जलालोद्दीन काजी, नगरसेवक इम्रान हुसैनी, भाजपाच्या गटनेत्या मंगला मुदगलकर यांच्यासह विरोधी सदस्यांनी बुधवारी सायंकाळी मनपा आयुक्त रेखावार यांची भेट घेतली व कार्यारंभ आदेश रद्द करण्याची मागणी केली़स्थायी समितीला डावलून कसा काय निर्णय घेतला ? असा सवाल केला़ त्यावर रेखावार यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार निर्णय घेतल्याचे सांगितले़ वरिष्ठांनी लेखी स्वरुपात सूचना दिल्या होत्या का? असा प्रतिप्रश्न विरोधी सदस्यांनी केला़ त्यावर रेखावर यांनी लेखी आदेश नसल्याचे सांगितले़ यावरुन बैठकीत बरीच चर्चा झाल्याचे समजते़ शेवटी या संदर्भात रेखावार यांनी लेखी उत्तर विरोधी पक्षातील सदस्यांना द्यावे, अशी मागणी करण्यात आली़ त्याला रेखावार यांनी होकार दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले़