शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दरवाढीच्या निषेधार्थ सह्यांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 00:43 IST

नळजोडणीसाठी महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ११ हजार रुपयांच्या दरांना शहरातून आता विरोध वाढत चालला असून, मंगळवारी सायंकाळी वसमत रस्त्यावरील विद्यापीठ गेटसमोर ज्येष्ठ नागरिकांनी या निर्णयाविरुद्ध सह्यांची मोहीम सुरू केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नळजोडणीसाठी महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ११ हजार रुपयांच्या दरांना शहरातून आता विरोध वाढत चालला असून, मंगळवारी सायंकाळी वसमत रस्त्यावरील विद्यापीठ गेटसमोर ज्येष्ठ नागरिकांनी या निर्णयाविरुद्ध सह्यांची मोहीम सुरू केली.नळजोडणीचे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत. त्यामुळे हे दर कमी करावेत, अशी मागणी होत आहे. येथील काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी हा प्रश्न उचलून धरला शहरातील विविध सामाजिक संस्थांकडून मनपाला निवेदन देत हे दर कमी करण्याची मागणी केली जात आहे. त्यात आता ज्येष्ठ नागरिकांचीही भर पडली आहे.१२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ज्येष्ठ नागरिकांनी सह्यांची मोहीम सुरू केली. दरवाढ कमी करण्याच्या मागणीवर १२५ नागरिकांच्या सह्या घेण्यात आल्या. बुधवारी शिवाजी चौक, जिंतूर रोड व इतर भागातही ही मोहीम राबविली जाणार असून, एक हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मनपा आयुक्तांना दिले जाणार असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी दिली.अ.भा. कैकाडी महासंघटना४अखिल भारतीय कैकाडी महासंघटनेच्या वतीने ११ फेब्रुवारी रोजी याच प्रश्नांवर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. शहरातील नागरिकांना विश्वासात न घेता दरवाढ करण्याचा ठराव घेण्यात आला. नळजोडणीसाठी लावलेले दर अव्वाच्या सव्वा असून, सर्वसामान्यांची लूट केली जात आहे. तेव्हा जनतेचा विचार करुन अनामत रकमेसह ६ ते ७ हजार रुपये दर ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर संस्थापक संजय भेंडे, अमोल माने, दिगंबर जाधव, शिवाजी जाधव, अरुण जाधव, विठ्ठल गायकवाड, संजय गायकवाड, राजाभाऊ जाधव, अशोक गायकवाड, सुनील जाधव, श्रावण देशमुख, संभाजी शिंदे, गंगाधर शिंदे, गणेश पवार, श्रीकांत चव्हाण, शंकर सोळंके, शंकर पवार आदींची नावे आहेत.जेवढा खर्च तेवढेच पैसे घ्या- खापरे४नळ जोडणीसाठी ग्राहकाला जेवढा खर्च येणार आहे, तेवढ्याच रक्कमेचे बिल ग्राहकाकडून घ्यावे. सरसकट ११ हजार रुपये जोडणीसाठी घेणे योग्य राहणार नाही. महापालिकेने नागरिकांना नाहक आर्थिक भूर्दंड देऊ नये, अशी मागणी शिवलिंग खापरे यांनी केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी