शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी बसस्थानक :तात्पुरत्या शेडचा प्रस्ताव अधीक्षक अभियंत्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:17 IST

येथील बसस्थानकाच्या जागेमध्ये बसपोर्ट उभारले जाणार असून, त्यासाठी बसस्थानकाची जुनी इमारत पाडावी लागणार असल्याने तात्पुरत्या स्वरुपात याच जागेत एक शेड उभारण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाने तयार केला असून, तो मंजुरीसाठी औरंगाबाद येथील महामंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविण्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील बसस्थानकाच्या जागेमध्ये बसपोर्ट उभारले जाणार असून, त्यासाठी बसस्थानकाची जुनी इमारत पाडावी लागणार असल्याने तात्पुरत्या स्वरुपात याच जागेत एक शेड उभारण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाने तयार केला असून, तो मंजुरीसाठी औरंगाबाद येथील महामंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविण्यात आला आहे़परभणी शहरातील प्रवाशांच्या सुविधेसाठी अद्यावयत असे बसपोर्ट उभारण्यास शासनाने मंजुरी दिली आहे़ त्यासाठी १३ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे़ त्यामुळे बसपोर्ट उभारणीतील मुख्य अडथळा दूर झाला असून, एसटी महामंडळाने बसपोर्ट उभारणीसाठी निविदा प्रक्रिया राबविली़ विश्वशक्ती कन्स्ट्रक्शनला हे काम मिळाले आहे़ त्यामुळे लवकरच या ठिकाणी प्रत्यक्ष बसपोर्ट उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे़ बसस्थानक परिसरात बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूचा साठा करण्यात आला आहे़ तसेच इतर तयारीही पूर्ण झाली आहे़ बसपोर्टची उभारणी जुन्या बसस्थानकाच्या जागेतच होणार असल्याने या ठिकाणी अस्तित्वात असलेली जुनी इमारत पाडावी लागणार आहे़ त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने बसस्थानकाच्या जागेतच बस थांबा उभारण्याचा प्रस्ताव महामंडळाने तयार केला आहे़ त्यासाठी बसस्थानकाच्या समोर रस्त्यालगत असलेल्या १० मीटर जागेत तात्पुरत्या स्वरुपात पत्र्याचे शेड उभारण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाने तयार केला आहे़ या ठिकाणी साधारणत: १६ प्लॉटफॉर्म प्रस्तावित केले असून, याच जागेत प्रवाशांना बस सेवेचा लाभ घेता येणार आहे़दरम्यान, हा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या औरंगाबाद येथील अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविण्यात आला असून, प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे़ एसटी महामंडळाने नवीन बसपोर्ट उभारणीची तयारी सुरू केली आहे़ जुन्या बसस्थानकातील काही स्टॉल्स आणि इतर दुकाने बंद करण्याचे सूचित केले असून, बसस्थानकातील मुख्य कँटीनला सील लावले आहे़ तसेच इतर दुकानांनाही सील लावण्यात आले आहे़ त्यामुळे लवकरच बसस्थानकाची जुनी इमारत पाडून कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे़तातडीने निर्णयाची गरज४बसपोर्ट उभारणीच्या कामास साधारण: मार्च महिन्यामध्ये मंजुरी दिली होती़ त्यानंतर लोकसभेची आचारसंहिता लागली़ त्यामुळे बसपोर्ट उभारणीचे काम थांबले होते़४ सध्या पावसाळ्याचे दिवस असून, या काळात बांधकाम करताना अडथळे निर्माण होऊ शकतात़ त्यामुळे बसपोर्ट उभारणीचे काम तातडीने हाती घेणे गरजेचे आहे़ मात्र सध्या तरी न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे काम थांबले असल्याची माहिती एसटी महामंडळातून देण्यात आली़न्यायालयाच्या स्थगितीमुळे थांबले काम४परभणीतील बसस्थानकाची जुनी इमारत पाडण्याची कारवाई एसटी महामंडळाकडून केली जात असतानाच बसस्थानकातील काही स्टॉल्सधारकांनी इमारत पाडण्यास मंजुरी देऊ नये, अशा आशयाची याचिका न्यायालयात दाखल केली होती़४या याचिकेवर सुनावणी झाली असून, न्यायालयाने इमारत पाडण्यास स्थगिती दिली आहे़ त्यामुळे इमारत पाडण्याचे मुख्य कामच थांबले आहे़ न्यायालयाच्या निर्णयानंतरच बसपोर्टच्या उभारणी संदर्भातील कामांना सुरुवात होणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportएसटी