शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

परभणी:कोट्यावधींची इमारत बनली शोभेची वास्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:13 IST

या वर्षीचे शैक्षणिक सत्र संपले तरी समग्र शिक्षा अभियानांतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची इमारत सुरु न झाल्याने शिक्षण प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. या वसतिगृहासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींची तात्पुरती सोय कस्तुरबा गांधी विद्यालयात करण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): या वर्षीचे शैक्षणिक सत्र संपले तरी समग्र शिक्षा अभियानांतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची इमारत सुरु न झाल्याने शिक्षण प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. या वसतिगृहासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींची तात्पुरती सोय कस्तुरबा गांधी विद्यालयात करण्यात आली होती.माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या गळतीचे प्रमाण थांबविण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यशासन समग्र शिक्षा अभियान राबविते. या अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शाळेपासून घर दूर असलेल्या पालकांची आर्थिक दुर्बलता अथवा अन्य सामाजिक कारणांमुळे मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थिनींना आपले शिक्षण पुढे सुरु ठेवता यावे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. बहुसंख्य विद्यार्थिनींपर्यंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पोहोचावे, यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आताचे समग्र शिक्षा अभियानांतर्गत तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृह उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते.या ठिकाणी नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींची निवासाची नि:शुल्क सोय करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला होता. या वसतिगृहासाठी शहरातील नवा मोंढा परिसरात असलेल्या जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरातील जागा निवडण्यात आली होती. या जागेवर कोट्यावधी रुपये खर्च करुन या ठिकाणी सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन एका वर्षाची कालावधी उलटून गेला तरी वसतिगृह सुरु झाले नाही. सद्य स्थितीत ही इमारत शोभेची वास्तू बनली आहे. या वर्षी शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती.७० ते ८० विद्यार्थिनींनी नोंदणीही केली होती. मात्र वसतिगृह सुरु झाले नसल्याने या विद्यार्थिनींची तात्पुरती सोय कस्तुरबा गांधी विद्यालयात करण्यात आली होती. या ठिकाणी कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींची संख्या जास्त असल्याने निवासासाठी कस्तुरबा गांधी विद्यालयाची इमारत अपुरी पडत असल्याने मुलीना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या मुलीची तात्पुरती निवासाची व्यवस्था झाली नाही, अशा नोंदणी केलेल्या विद्यार्थिनींना आपल्या गावातून प्रवास करुन विद्यालय गाठावे लागत होते. काही विद्यार्थिनींच्या पालकांची आर्थिक स्थिती हलाख्याची असल्याने त्यांना मुलींचे शिक्षण थांबवावे लागत आहे.त्यामुळे पुढील वर्षातील शैक्षणिक सत्रात तरी वसतिगृह सुरु करावे, अशी मागणी विद्यार्थिनी, पालकातून होत आहे.इमारत पूर्ण; सुविधांचा अभाव४या वसतिगृहाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी या ठिकाणी विद्यार्थिनींसाठी लागणारे फर्निचर, खाट उपलब्ध झाले नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच या वसतिगृहासाठी गृहपाल, चौकीदार, स्वयंपाकी, सहाय्यक ही पदे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहिरात देऊन भरण्यात येणार आहेत. याबाबतची निवड प्रक्रियाच सुरु झाली नाही. त्यामुळे विद्यार्थीनींना पुढील शैक्षणिक वर्षात तरी रहाण्याची सुविधा उपलब्ध देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.या घटकाला: होतोय लाभ१४ ते १८ वर्षे वयोगटातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक समुदाय तसेच दारिद्ररेषेखालील कुटुंबातील इयत्ता ९ वी आणि १२ वी च्या वर्गातील विद्यार्थिनींचा गट हा या योजनेचा लक्ष्य गट आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थिनींना या वसतिगृहांमध्ये प्राधान्यक्रमाने प्रवेश दिला जातो . किमान ५० टक्के विद्यार्थिनी या अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक आदी घटकातील असाव्यात असा आदेश आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र