शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

परभणी : रस्त्यासाठी निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 11:49 PM

वारंवार पाठपुरावा करूनही राणीसावरगाव ते रेवातांडा हा सहा किलोमीटर अंतराचा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने पालम आणि गंगाखेड तालुक्यातील पाच गावांमधील ग्रामस्थांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वारंवार पाठपुरावा करूनही राणीसावरगाव ते रेवातांडा हा सहा किलोमीटर अंतराचा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने पालम आणि गंगाखेड तालुक्यातील पाच गावांमधील ग्रामस्थांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.पालम तालुक्यातील रेवातांडा, गंगाखेड तालुक्यातील कुंडगीरवाडी, चंदू नाईक तांडा, सोमला नाईक तांडा, थावरु नाईक तांडा या ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जाणारा हा एकमेव रस्ता असून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.रस्ता खराब असल्याने वरील सर्व गावांची बस सेवा बंद आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. रस्त्याअभावी रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो.सहा किलोमीटर अंतराचा हा रस्ता दुरुस्त करावा, यासाठी ग्रामस्थांनी गंगाखेड तसेच पालम तहसील कार्यालयात अनेकवेळा निवेदने दिली. विशेष म्हणजे, तिन्ही ग्रामपंचायतींनी रस्ता दुरुस्त करण्याचा ठराव घेतला आहे. असे असताना रस्ता दुरुस्त होत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर २१ आॅगस्ट रोजी तिन्ही ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या गावांतील सुमारे दोनशे ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांची भेट घेऊन त्यांना रस्त्याची अवस्था नमूद केली आहे. ३० दिवसांत रस्त्याचे काम झाले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांचीही भेट घेऊन त्यांना रस्त्याच्या प्रश्नी साकडे घातले.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी