शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बोगस प्रमाणपत्राची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:48 IST

तालुक्यामध्ये विद्यार्थी व नागरिकांना लागणारे वेगवेगळे प्रशासकीय प्रमाणपत्रे दलालांमार्फत सहज उपलब्ध होत असल्याने बोगस प्रमाणपत्रांची धास्ती महसूल प्रशासनाने घेतली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): तालुक्यामध्ये विद्यार्थी व नागरिकांना लागणारे वेगवेगळे प्रशासकीय प्रमाणपत्रे दलालांमार्फत सहज उपलब्ध होत असल्याने बोगस प्रमाणपत्रांची धास्ती महसूल प्रशासनाने घेतली आहे़विद्यार्थी व नागरिकांना उत्पन्न, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, शेतीचा उतारा, सातबारा यासह ४२ नमुन्यातील प्रमाणपत्र लागतात़ ही प्रमाणपत्रे काढताना अधिकृत महा-ई-सेवा केंद्रातून प्रमाणपत्र काढावीत़ इतर ठिकाणाहून घेतलेले प्रमाणपत्र बोगस असू शकतात़ त्यामुळे अशा प्रकारच्या प्रमाणपत्रांमुळे फौजदारी स्वरुपाची कार्यवाही होऊ शकते़ हे टाळण्यासाठी नागरिकांनी बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांची नावे व लेखी तक्रार महसूल प्रशासनाकडे करावी, असे आवाहन जिंतूरच्या तहसीलदारांनी केले आहे़ या संदर्भात चक्क फलक लावून बोगस प्रमाणपत्रापासून सावध करण्याचा इशारा नागरिकांना दिला आहे़ या सर्व प्रकारामुळे महसूल प्रशासन बोगस प्रमाणपत्राला आळा घालू शकत नाही, असेच दिसून येत आहे़ याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.जिंतूर तालुक्यात बोगस प्रमाणपत्रे४जिंतूर तालुक्यात विद्यार्थ्यांना, कर्ज घेण्यासाठी बँकेत जी प्रमाणपत्रे लागतात, दलालामार्फत ती काही मिनिटांत उपलब्ध करून दिली जातात़ या संदर्भात दोन महिन्यांपूर्वी महसूल विभागाने काही दलालांवर कारवाई केली होती.यावेळी बोगस प्रमाणपत्र जप्त केली; परंतु, पुन्हा सर्व काही अलबेल झाले असल्याचे दिसून येत आहे़ पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची थातूर-मातूर चौकशी करून हे प्रकरण गुंडाळले़ परिणामी बोगस प्रमाणपत्र देणारे पुन्हा सक्रिय होवू लागले आहेत़ थातूरमातूर कारवाईमुळे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे़ विशेष म्हणजे तालुक्यात हजारो बोगस प्रमाणपत्रे आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे़