शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: बोनमॅरोसाठी २०० जणांचे रक्त नमुने घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:32 IST

थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या बोनमॅरोट्रान्सप्लांट शिबिरात २०० जणांचे रक्त नमुने जमा करण्यात आले असून या रक्त नमुन्यांची चेन्नई येथील हिस्टोजेनिक या संस्थेमार्फत अमेरिकेतील प्रयोगशाळेत तपासणी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या बोनमॅरोट्रान्सप्लांट शिबिरात २०० जणांचे रक्त नमुने जमा करण्यात आले असून या रक्त नमुन्यांची चेन्नई येथील हिस्टोजेनिक या संस्थेमार्फत अमेरिकेतील प्रयोगशाळेत तपासणी होणार आहे.थॅलेसिमिया सपोर्ट ग्रुपच्या वतीने २४ मार्च रोजी परभणी शहरातील बी.रघुनाथ सभागृहात थॅलेसिमियाग्रस्तांसाठी बोनमॅरोट्रान्स्प्लांट तपासणी शिबीर घेण्यात आले. लायन्स क्लब आणि परभणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासाठी सहकार्य केले. मुंबई येथील दात्री फाऊंडेशनच्या वर्षा आणि नाशिक येथील ज्योती टंडन यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात जमा करण्यात आलेल्या रक्त नमुन्यांची अमेरिकेतील प्रयोगशाळेत तपासणी झाल्यानंतर प्राप्त झालेला रुग्णांना दिला जाणार आहे.राज्यात प्रथमच परभणी येथे अशा स्वरुपाचे शिबीर पार पडले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी लायन्स क्लबचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मुद्गलकर, पत्रकार गणेश पांडे, रक्तविकारतज्ज्ञ डॉ.मनोज तोष्णीवाल, नाशिक येथील गिरीष भदरखे, जिंतूर येथील डॉ. बाहेती, सामान्य रुग्णालयातील कदम, ज्ञानेश्वर खटींग, मुश्ताक पठाण, मिलिंद लांबे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रिझवान काजी, डॉ.विशाल पवार, डॉ.समीर नवल, डॉ. राजगोपाल कालानी आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ.तोष्णीवाल व भदरखे यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या शंकाचे निरसण केले. तसेच या आजारावरील उपचारासंदर्भात आर्थिक मदत करणाऱ्या संस्थांची माहिती दिली. कार्यक्रमात थॅलेसिमिया सपोर्ट ग्रुपच्या वतीने रुग्णांसाठी तयार केलेल्या पुस्तिकेचीही विमोचन करण्यात आले. लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी थॅलेसिमिया सपोर्ट ग्रुपच्या सदस्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :parabhaniपरभणीdoctorडॉक्टर