शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत नऊ बस फोडल्या; दगडफेकीने तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:56 IST

भिमा- कोरेगाव येथे आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी मंगळवारी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान संतप्त युवकांनी केलेल्या दगडफेकीत पाथरी येथे ३, गंगाखेड येथे २ तर परभणी शहरात ४ अशा ९ बससह ६ चारचाकी आणि २० दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले. संतप्त युवकांनी ठिकठिकाणी दगडफेक केल्याने तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भिमा- कोरेगाव येथे आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी मंगळवारी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान संतप्त युवकांनी केलेल्या दगडफेकीत पाथरी येथे ३, गंगाखेड येथे २ तर परभणी शहरात ४ अशा ९ बससह ६ चारचाकी आणि २० दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले. संतप्त युवकांनी ठिकठिकाणी दगडफेक केल्याने तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते. परभणीत जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी २ ठिकाणी सौम्य लाठीमार केला. दगडफेकीत दोन पोलीस कर्मचाºयांसह ८ ते १० जण किरकोळ जखमी झाले आहेत.भीमा- कोरेगाव येथे सोमवारी आंबेडकरी अनुयायांवर हल्ला झाल्याची घडली होती. या घटनेचे पडसाद परभणी जिल्ह्यातही उमटले. सोमवारी सायंकाळी परभणीत बाजारपेठ बंद करण्यात आली. त्यानंतर मंगळवारीही बंदचे आवाहन करण्यात आले होते. परभणी शहरात बंदचे आवाहन झाले नसले तरी सकाळपासूनच व्यापारपेठ बंद होती. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास युवकांचे जत्थे शहरातील प्रमुख मार्गावरुन घोषणा देत फिरत होते. विसावा कॉर्नर भागातून आलेला संतप्त जमाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत असताना जाम नाका येथे या जमावाने दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात परभणी- उखळी (एम.एच.२०/०१२४) या बसवर दगडफेक झाल्याने काचा फुटल्या. तसेच इतर तीन वाहनांच्याही काचा फुटल्या. महाराणा प्रताप चौकातही संतप्त जमावाने दगडफेक करीत अनेक वाहनांचे नुकसान केले. स्टेशनरोड परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांचे जमावाने नुकसान केले. या ठिकाणी उभ्या असलेल्या एम.एच.२२/यु.७०४३ या कारच्या काचा फोडल्या. स्टेशनरोडवरील अ‍ॅक्सीस बँकेच्या एमटीएमच्या काचाही फोडण्यात आल्या. हा जमाव महापालिकेसमोर आल्यानंतर या ठिकाणी ओव्हरसिस इंडियन बँकेच्या वरच्या मजल्यावर असलेल्या काचांवर दगडफेक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी सौम्य लाठीमारही केला. काही वेळानंतर याच परिसरात निषेध सभा घेण्यात आली. यावेळी वक्त्यांनी आपल्या भाषणातून भिमा कोरेगाव येथील घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. सभा संपल्यानंतर अचानक दगडफेक झाल्याने धावपळ झाली. याच परिसरात अ‍ॅड.अशोक सोनी यांच्या घरावरही दगडफेक झाल्याने घरासमोरील काचा फुटल्या. दगडफेकीमध्ये नवा मोंढा पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी व ८ ते १० नागरिक किरकोळ जखमी झाले. शहरातील एसटी बस स्थानकासमोरील दुकाने बंद करणाºया काही युवकांवरही पोलिसांनी लाठीमार केला. दरम्यान, याच वेळी वसमत रोडवरील काळी कमान येथे वसमत- औरंगाबाद (एम.एच.२०/२२४८) या बसवर दगडफेक झाल्याने बसचे नुकसान झाले आहे. दुपारी २ वाजेपर्यंत शहरात तणाव होता. या दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त तोकडा पडल्याचेही दिसून आले. दुपारनंतर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना निवेदन देऊन आंबेडकरी जनतेने आपल्या संतप्त भावना प्रशासनासमोर मांडल्या. तत्पूर्वी एस.टी.महामंडळाने सकाळी ११ वाजेपासून आगारातून बसेस सोडल्या नाहीत.पाथरीत तीन बसच्या काचा फोडल्यापाथरी : पाथरीत झालेल्या दगडफेकीत तीन बस, दोन जीप आणि एका कारच्या काचा फोडल्या. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. विविध दलित संघटना यांनी रॅली काढून तहसीलदार यांना निवेदन दिले. मोंढा परिसर, नाक्यावर, तसेच बसस्थानाक या तीन ठिकाणी उमरा- पाथरी (एमएच २०/बी.एल. १७९२), पाथरी- परळी (एम.एच.१४/बीटी १७६१) आणि अंबड- पाथरी (एम.एच. १४/बीटी १४३२) या तीन बस वर दगडफेक झाली. मोंढा परिसरात एका कारवरही दगडफेक झाली. शहरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होती. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर टी.डी. रुमाले, विठ्ठल साळवे, अवडाजी ढवळे, उत्तम झिंजुर्डेे, शाम ढवळे, महादेव साळवे, दिलीप घागरमाळे, दिलीप मोरे, अशोक पोटभरे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.गंगाखेडमध्येही दोन बस फोडल्यागंगाखेड : येथे दोन बसवर दगडफेक झाल्याने तालुक्यातील बस वाहतूक बंद पडली. परिणामी प्रवाशांची तारांबळ उडाली. सकाळी दहा वाजेच्या सुमारास गंगाखेड-लोहा बसची (एम.एच.०६/बी.एल. ३४९०) मालेवाडी पाटीजवळ अज्ञातांनी काच फोडली. त्यानंतर बस वाहतूक बंद केली. याच दरम्यान दुपारी बारा वाजेच्या सुमारास सोनपेठ- गंगाखेड या बसवर परळी नाका परिसरात दगडफेक झाली. यात बसच्या काचा फुटल्या असून, एक प्रवासी जखमी झाला आहे. सकाळी ११ वाजता मोर्चा काढून तहसीलदारांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज बांधव उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी तत्काळ बंदोबस्त वाढवित बसस्थानक, परळी नाक्यासह मुख्य चौकात पॉइंट लावून शहरात गस्त वाढविली.पूर्णा, सेलू, मानवत, पालम, सोनपेठमध्ये कडकडीत बंद सोनपेठमध्ये बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद राहिली. तालुक्यातील आंबेडकरी विचारांच्या संघटनांनी शहरात फिरुन व्यापाºयांना बंदचे आवाहन केले. व्यापाºयांनीही बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर मारोती रंजवे, विनोद गायकवाड, शरद बनसोडे, उत्तम भाग्यवंत, सचिन खंदारे, सुनील रंजवे, संभाजी बोकरे, शिवाजी खंदारे, नितीन खंदारे आदींच्या स्वाक्षºया आहेत.सेलू शहरात जिंतूर नाका येथे रिपब्लिकन सेना व विविध पक्ष संघटनेच्या वतीने सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना निवेदन देण्यात आले. बससेवा बंद असल्याने विद्यार्थी, प्रवाशांची तारांबळ उडाली. या आंदोलनात सुबोध काकडे, रवि भदर्गे, अ‍ॅड.विष्णू ढाले, बुवाजी निकाळजे, गौतम साळवे, प्रदीप धापसे, विशाल धापसे, विजय खेबाळे, बालकिशन साळवे, भगिरथ धापसे, अमित धापसे, रवि पाईकराव, दीपक बच्छीरे, विकास कांबळे, शेख इस्माईल यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होेते. शहरातील दुकाने काही काळ बंद होती.मानवतमध्ये बाजारपेठ बंद ठेवून निषेध मोर्चा काढण्यात आला. आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाºयांनी एकत्र येऊन बंदचे आवाहन केले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घटनेच्या निषेधार्थ शहरातून मोर्चाही काढण्यात आला. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष अमृतराव भदर्गे, मानवी हक्क अभियानचे अशोक पंडित, अनंत भदर्गे, राजू खरात, नितीन गवळी, चंद्रकांत मगर, धम्मपाल सोनटक्के, राहुल डाके, महेंद्र ठेंगे, छगन भदर्गे, दीपक ठेंगे, विशाल धापसे, रवि पंडित, श्रीरंग नितनवरे, विजय खरात, किरण पंडित, नागसेन भदर्गे, अमोल मगर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.पालम शहरातही कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी जालिंदर हत्तीअंबिरे, वैजनाथ हत्तीअंबिरे, संजय थिट्टे, गौतम हत्तीअंबिरे, गणेश हत्तीअंबिरे, विजय हनवते, निवृत्ती हत्तीअंबिरे, बाबासाहेब एंगडे, राहुल हत्तीअंबिरे, अजय हनवते, कैलास झंजारे, शिवदर्शन हत्तीअंबिरे, गंगाधर हनवते, राहुल गायकवाड, अविनाश हनवते, भिमराव काचोळे, शेषराव एंगडे, भीमराव रायबोले, रणजीत हत्तीअंबिरे, माधव हनवते, सूर्यकांत रायबोले, अरविंद थिट्टे, मंगेश जोंधळे, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.पूर्णा : पूर्णा शहरातही कडकडीत बंद पाळण्यात आला. आंबेडकरवादी संघटनांनी भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी प्रकाश कांबळे, उत्तम खंदारे, अ‍ॅड.हर्षवर्धन गायकवाड, दिलीप हनुमनते, अ‍ॅड.धम्मा जोंधळे, विरेश कसबे, महेबूब कुरेशी, शिवाजी वेडे आदी उपस्थित होते. याबाबत भीमशक्ती महिला आघाडीनेही निषेध केला.