शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

परभणी : राणीसावरगावमध्ये मोठी आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:05 IST

येथील दोन कापड दुकानांना १९ डिसेंबर रोजी मध्यरात्री अचानक आग लागल्याने मोठी धावपळ झाली. अग्नीशमन दलाची गाडी उशिराने दाखल झाल्याने आगीतील नुकसानीचा आकडा वाढला. दरम्यान, अग्नीशमन दलासह पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कराणीसावरगाव (परभणी): येथील दोन कापड दुकानांना १९ डिसेंबर रोजी मध्यरात्री अचानक आग लागल्याने मोठी धावपळ झाली. अग्नीशमन दलाची गाडी उशिराने दाखल झाल्याने आगीतील नुकसानीचा आकडा वाढला. दरम्यान, अग्नीशमन दलासह पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.अहमदपूर-गंगाखेड रस्त्यावर राणीसावरगाव येथे राजू सालमोटे यांच्या मालकीच्या इमारतीत दयानंद देशमुख यांचे देशमुख क्लॉथ सेंटर व लक्ष्मण कवडे यांचे कवडे क्लॉथ सेंटर ही दोन दुकाने आहेत. बुधवारी मध्यरात्री साधारणत: २.१५ च्या सुमारास या दुकानांंना आग लागली. राजू सेलमोटे यांना दुसऱ्या मजल्यावरून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी धावपळ करून कॉलनीतील नागरिकांना उठविले. शटर तोडून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आग वाढतच चालली होती. त्यामुळे पोलीस प्रशासनाला तसेच तहसील प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली. तहसीलदार व गंगाखेड नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांना ही माहिती मिळताच त्यांनी अग्नीशमन गाडी पाठविली; परंतु, गाडी येण्यास उशिर झाल्याने आगीचे लोट तिसºया मजल्याकडे जात होते. त्यामुळे आजूबाजुच्या घरांनाही धोका निर्माण झाला होता. नागरिकांनी सतर्कतेने प्रयत्न करून तिसºया मजल्यावरील तीन गॅस सिलेंडर बाहेर काढले. त्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, पिंपळदरी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तलाठी मुळे यांनी घटनेचा पंचनामा केला असून देशमुख क्लॉथ सेंटरमध्ये २५ ते ३० लाख रुपयांचा माल जळून खाक झाला. तर कवडे क्लॉथ सेंटरमधील अंदाजे ३० ते ४० लाख रुपयांचा माल जळून खाक झाल्याची चर्चा आहे.‘गंगाखेड शुगर’ची अग्नीशमन गाडी दाखल४राणीसावरगाव येथे आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर गंगाखेड शुगरचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांनी तातडीने कारखान्यातील अग्नीशमन दलाची गाडी पाठविली. अग्नीशमनची गाडी दाखल झाल्यानंतरच या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. काही वेळाने आग पूर्णत: आटोक्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला; परंतु, ही आग विझवेपर्यंत दुकानातील कपडे पूर्णत: जळून खाक झाले. आगीच्या घटनेनंतर पोलीस कर्मचारी आणि परिसरातील नागरिक तातडीने मदतीला धावले. त्यामुळे आग आटोक्यात आणणे शक्य झाले.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआग