शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : घरकुल लाभार्थ्यांना मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 23:30 IST

पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेचे काम वाळू उपलब्ध नसल्याने ठप्प झाले होते़ मात्र तालुक्यातील वाळू धक्के सुरू झाल्याने कमी दरात वाळू उपलब्ध होत असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़ घरकुलांची कामे आता पूर्ववत सुरू झाले असून, नव्याने घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनीही कामे सुरू केली आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेचे काम वाळू उपलब्ध नसल्याने ठप्प झाले होते़ मात्र तालुक्यातील वाळू धक्के सुरू झाल्याने कमी दरात वाळू उपलब्ध होत असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़ घरकुलांची कामे आता पूर्ववत सुरू झाले असून, नव्याने घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनीही कामे सुरू केली आहेत़केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल योजनेंतर्गत तालुक्यासह शहरातील लाभार्थ्यांना घरकुले मंजूर केली़ त्यासाठीची पंचायत समिती प्रशासनाने प्रक्रिया पूर्ण करून संबंधित लाभार्थ्यांना पैसाही उपलब्ध करून दिला; परंतु, घरकुलाची ही बांधकामे करण्यासाठी लाभार्थ्यांकडे वाळू उपलब्ध होत नव्हती़ तालुक्यातील एकाही वाळू धक्क्याचा लिलाव झाला नव्हता़ त्यातच बाजारातील वाळू विकत घ्यायची असेल तर ३ ब्राससाठी जवळपास २० हजार रुपये मोजावे लागत होते़ त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांना बाजारातील वाळू विकत घेऊन घरकुलाची उभारणी करणे अशक्य होते़ त्यामुळे मानवत शहरातील लाभार्थ्यांनी पंचायत समिती, तहसील प्रशासनाची भेट घेऊन घरकुलाच्या बांधकामासाठी शासकीय भावात वाळू उपलब्ध करून द्यावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला़ परंतु, लाभार्थ्यांना वेळेवर वाळू काही मिळाली नाही़ परिणामी पंतप्रधान आवास व रमाई घरकुल योजनेतील मंजूर झालेली घरकुलांची कामे ठप्प पडली होती़रमाई घरकुल योजनेंतर्गत मानवत शहरातील आंबेडकर नगर, बुद्धनगर यासह विविध ठिकाणी लाभार्थ्यांची घरकुलांची कामे सुरू आहेत़ बांधकाम अर्ध्यापर्यंत आल्यानंतर वाळूची आवश्यकता भासू लागली़ मात्र लिलावाची प्रक्रिया सुरू नसल्याने वाळूची टंचाई निर्माण झाली होती़अवैधरीत्या साठून ठेवणाºया वाळूची अव्वाच्या सव्वा दराने विक्री सुरू केल्याने गोरगरीब लाभार्थ्यांना या दराने वाळू घेणे परवडत नव्हते़ तालुक्यातील वांगी आणि कुंभारी येथील वाळू धक्क्याचा लिलाव झाल्याने मुबलक वाळू उपलब्ध होत आहे़सद्यस्थितीत ३ ब्रास वाळूसाठी १२ हजार रुपये किंमत मोजावी लागत आहे. पूर्वीपेक्षा वाळूचे भाव कमी झाल्याने लाभार्थी वाळूची मागणी करीत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे़१०२ घरकुलांची कामे सुरू४मानवत नगरपालिकेंतर्गत रमाई घरकुल योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ६८ घरकुले मंजूर झाली होती. त्यापैकी ३४ घरकुलांची कामे सुरू आहेत़ तर दुसºया टप्प्यात १०५ घरकुलांना मंजुरी असून, ६८ घरकुलांची कामे सुरू असल्याची माहिती नगरपालिकेने दिली़ सुरुवातीला ३ ब्रास वाळू २० हजार रुपये अशा सोन्याच्या भावाने गोरगरीब लाभार्थ्यांना घ्यावी लागली़ यामुळे आर्थिक फटका बसला आहे़ सरते शेवटी तालुक्यातील वाळू धक्के सुटल्याने भाव उतरले असून, रमाई घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाsandवाळू