शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपाकडे बँकांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:25 IST

तालुक्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची खरेदी करण्यासाठी पैशाची गरज निर्माण झाली आहे; पण अद्यापही राष्टÑीयकृत बँकांनी कर्ज वाटप सुरू केले नसून शेतकºयांची मोठी गैरसोय झाली आहे. कर्जवाटपाकडे बँका जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची खरेदी करण्यासाठी पैशाची गरज निर्माण झाली आहे; पण अद्यापही राष्टÑीयकृत बँकांनी कर्ज वाटप सुरू केले नसून शेतकºयांची मोठी गैरसोय झाली आहे. कर्जवाटपाकडे बँका जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.पालम शहरात राष्ट्रीयकृत बँकांच्या दोन व ग्रामीण भागामध्ये २ शाखा कार्यरत आहेत. यामधून दरवर्षी शेतकºयांना नेहमीच कर्ज देताना हात आखडता घेतला जात आहे. मागील वर्षी तर उन्हाळ्यात राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकºयांना पीक कर्ज देऊन प्रताप केला होता.खरीप व रबी या दोन्ही हंगामात शेतकºयांना पेरणीपूर्वक पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही. प्रस्ताव दाखल करूनही अधिकाºयांकडून त्याकडे कानाडोळा केला जात आहे. तसेच शेतकºयांना पीक कर्ज मागण्यासाठी गेले असता तुच्छतेची वागणूक दिली जात आहे.खरीप हंगामाची लगबग सुरू होऊनही बँकांनी मात्र शासनाचे आदेश धाब्यावर बसून शेतकºयांना कर्ज देण्याकडे पाठ फिरवलेली आहे. वेळेवर कर्ज दिले जात नसल्याने शेतकºयांना खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत असून मोठी गैरसोय निर्माण झालेली आहे.पाऊस पडताच पेरणी करावी लागत असल्याने शेतकºयांनी अगोदरच बियाणे व रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केलेली आहे.पेरणी झाल्यानंतर बँकाचे पीककर्ज घेऊन काय उपयोग? असा सवाल शेतकºयांमधून केला जात आहे. दरवर्षीच पीक कर्ज देताना बँक वेळेचे बंधन न पाळता मनमानी पद्धतीने पीककर्ज वाटप करीत असल्याने पालम तालुक्यातील शेतकºयांना पीक कर्जाचा फारसा उपयोग होत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकFarmerशेतकरी