शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अनुकंपा तत्त्वावर शिक्षक भरतीस टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:06 IST

अनुकंपा तत्त्वावर शिक्षकांची भरती करण्याचे राज्य शासनाचे आदेश असतानाही येथील जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावरील शिक्षकांची भरती होत नसल्याने उमेदवारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अनुकंपा तत्त्वावर शिक्षकांची भरती करण्याचे राज्य शासनाचे आदेश असतानाही येथील जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावरील शिक्षकांची भरती होत नसल्याने उमेदवारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.परभणीजिल्हा परिषदेत शिक्षकांची २५९ पदे रिक्त आहेत. तसेच अनुकंपा धारकांची यादीही जाहीर झाली आहे. रिक्त पदांपैकी १० टक्के पदे अनुकंपाधारकांतून भरण्याचे शासनाचे आदेश असून, परभणी जिल्हा परिषदेत मात्र या आदेशांची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. विशेष म्हणजे, राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये अनुकंपा तत्त्वावर शिक्षकांची भरती करुन त्याची प्रसिद्धीही केली जात असताना परभणी जिल्हा परिषद प्रशासन मात्र अनुकंपा तत्त्वावर भरती करीत नसल्याने पात्र उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर आहे.दोन दिवसांपूर्वी येथील अनुकंपाधारकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या.राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १० जून २०१९ रोजी शासन आदेश काढला असून, त्यात अनुकंपा नियुक्तीसाठी पदभरतीची मर्यादा निश्चित केली आहे. सरळ सेवेने पदभरती करताना प्रति वर्षी रिक्त होणाºया पदांपैकी १० टक्के पदे अनुकंपा नियुक्तीने भरावित, असे स्पष्टपणे या आदेशात नमूद केले आहे. विशेष म्हणजे, याच आदेशाचा आधार घेत अकोला, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये अनुकंपाधारकांना १० टक्के कोट्यातून शिक्षण सेवक म्हणून नियुक्तीही देण्यात आली आहे.२५ पदे अनुकंपातून भरण्याची मागणी४परभणी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवकांची २५९ पदे रिक्त असून,१० टक्केनुसार २५ पदे अनुकंपा तत्त्वाने भरण्यात यावीत.४अनुकंपाधारकांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शिक्षण सेवक पदावर नियुक्ती द्यावी, अशी मागणी अनुकंपाधारकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.४मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिलेल्या निवेदनावर साईप्रसाद कांगणे, प्रतिक आचणे, महेश गाजरे, संदीप पवार, अमोल माटकर, ज्ञानेश्वर सावंत आदींची नावे आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षकzpजिल्हा परिषद