शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
...मग प्रत्येक भारतीयावर ₹ 4,80,000 कर्ज कशाचे? RBI चा रिपोर्टवर काँग्रेसचे बोट, मोदी सरकारवर चढवला हल्ला
3
'त्या' शेतकरी, शेतमजुरांना १० लाखांची मदत द्या; काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची मागणी
4
वैजापूरमधील महिला कीर्तनकार हत्या प्रकरणात परप्रांतीय कनेक्शन, दोन आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
5
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
6
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
7
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
8
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
9
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
10
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
11
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
12
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
13
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
14
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
15
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
16
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
17
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
18
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
19
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
20
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट

परभणी: तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:49 IST

परभणी तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी केला; परंतु, त्यात त्यांना यश न आल्याने शेजारीच असलेल्या एका मेडिकलमध्ये प्रवेश करुन जवळपास ४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

लोकमत न्यूज नेटवर्कपेडगाव (परभणी) : परभणी तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी केला; परंतु, त्यात त्यांना यश न आल्याने शेजारीच असलेल्या एका मेडिकलमध्ये प्रवेश करुन जवळपास ४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.पेडगाव येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. या बँक शाखेत गुरुवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून आत प्रवेश केला. त्यानंतर बँकेतील कपाटे फोडली. त्यात काहीही हाती न लागल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा तिजोरीकडे वळवला; परंतु, तिजोरी फोडता न आल्याने चोरटे तेथून निघून गेले. बँकेच्या शेजारीच असलेल्या सिद्धीविनायक स्टोअरचे शटर वाकवून चोरट्यांनी त्यात प्रवेश केला. मेडिकलच्या गल्ल्यात असलेले ४ हजार रुपये लंपास केले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पुंगळे यांच्यासह बीट जमादार युसूफ पठाण घटनास्थळी दाखल झाले. रवि देशमुख यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिते करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी