शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

परभणी : ग्रामपंचायतमधील अभिलेखे जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:40 IST

तालुक्यातील मुळी ग्रामपंचायत कार्यालयातील अभिलेखे जाळल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली असून, या घटनेने वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातील मुळी ग्रामपंचायत कार्यालयातील अभिलेखे जाळल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली असून, या घटनेने वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे़मुळी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार काही ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती़ या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतमधील संपूर्ण अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावेत, असे आदेश दिले होते़ २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विस्तार अधिकारी भालेराव यांनी तशी सूचना ग्रामसेवक नवटंके यांना देऊन बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे सांगितले़ मात्र बुधवारी सकाळीच ही घटना समोर आल्याने वेगवेगळ्या चर्चा होत आहेत़ ग्रामपंचायतमधील सेवक सकाळी कार्यालयात आल्यानंतर त्यांना ग्रामपंचायतीचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले़ आत जावून पाहणी केली असता कपाटाची दारे उघडे होती़ आतील दस्ताऐवज गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आजुबाजूला पाहणी केली़ तेव्हा कार्यालयाच्या बाहेरील पिंपळाच्या झाडाखाली दस्ताऐवज जळालेल्या अवस्थेत त्यांना दिसले़ ही माहिती ग्रामसेवक नवटंके यांना दिली़ नवटंके यांनी कार्यालयात येऊन पाहणी केली असता कार्यालयातील संगणक संचही गायब झाल्याचे आढळून आले़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़

टॅग्स :parabhaniपरभणीfireआग