शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
3
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
4
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
5
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
6
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
7
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
8
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
9
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
10
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
11
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
12
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
13
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
14
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
15
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
16
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
17
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
18
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
19
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना

परभणी : एक कोटी रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 11:45 IST

पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत २०१७-१८ मध्ये मंजूर झालेल्या रक्कमेतून परभणी जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी १ कोटी ५ लाख रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत २०१७-१८ मध्ये मंजूर झालेल्या रक्कमेतून परभणी जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी १ कोटी ५ लाख रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे.परभणी जिल्ह्यातील श्रीसंत ईश्वरसिंग महाराज वंजारा समाज संत समाधी स्थळ अमरगड, जिंतूर येथील तीर्थक्षेत्राचा विकास करणे, जिंतूर येथीलच श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र नेमगिरी येथे विकासकामे, पालम तालुक्यातील पालम- सोमेश्वर-जांभूळबेट रस्त्याची सुधारणा करणे, पूर्णा तालुक्यातील गोळेगाव रस्त्याची सुधारणा करणे या कामासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत २०१७-१८ या वर्षामध्ये निधी नियतव्यय अर्थसंकल्पित झाला होता. त्यापैकी ८० टक्के रक्कम वितरणास उपलब्ध करुन देण्यात आली होती. उपलब्ध निधीमधून जिल्हाधिकारी यांना विकासकामांसाठी निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. या कामासाठी अंदाजित ८ कोटी १२ लाख ७० हजार रुपयांच्या निधीपैकी १ कोटी ५ लाख रुपयांच्या निधी वितरणाचा समावेश आहे. या अंतर्गत पालम- सोमेश्वर रस्त्याच्या सुधारणेसाठी ६० लाखापैकी १५ लाखांचा निधी, पूर्णा तालुक्यातील गोळेगाव रस्त्याच्या सुधारणेसाठी ९५ लाख ४८ हजार रुपयांपैकी १५ लाखांच्या निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. याच रस्त्यासाठी ७९ लाख ६९ हजार रुपयांपैकी १० लाखांचा निधीचा समावेश आहे. तसेच अमरगड येथील श्री संत ईश्वरसिंग महाराज वंजारा समाज संत संबंधित समाधीस्थळ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ३ कोटी २६ लाखांपैकी ३० लाखांचा निधी तर नेमगिरी येथील श्री दिगंबर जैन अतिशय तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी २ कोटी ७७ लाख २७ हजारांपैकी ३५ लाखांच्या निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे.मंजूर अनुदानापेक्षा जास्त खर्च होणार नाही, याची घ्यावी लागणार दक्षतावितरित केलेल्या निधीतून खर्च करताना वित्तीय नियमांचे आणि विविध नियमांअंतर्गत नेमून दिलेल्या कार्य पद्धतीचे पालन करावे लागणार आहे. तसेच मंजूर अनुदानापेक्षा जास्त अनुदान खर्च होणार नाही, याची दक्षताही जिल्हाधिकारी यांना घ्यावी लागणार आहे. ही कामे मंजूर तरतुदीतून करावयाचा खर्च ३१ मार्च २०१८ पर्यंत करुन मंजूर कामे पूर्ण करावी लागणार आहेत.