शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : निवडणुकीचे काम करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 00:22 IST

बीएलओ व अन्य निवडणुकीच्या कामासाठी घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शनिवारी प्रभारी जिल्हाधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी काढले आहेत़ त्यामुळे या कामातून जि़प़ कर्मचाºयांची सुटका झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बीएलओ व अन्य निवडणुकीच्या कामासाठी घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शनिवारी प्रभारी जिल्हाधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी काढले आहेत़ त्यामुळे या कामातून जि़प़ कर्मचाºयांची सुटका झाली आहे़जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनीच जि़प़ कर्मचाºयांच्या बीएलओ म्हणून व इतर निवडणूक कामासाठी करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी १० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांच्याकडे केली होती़ त्यानंतर जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर हे १३ जानेवारीपासून रजेवर गेले आहेत़ त्यांचा पदभार सीईओ पृथ्वीराज यांच्याकडेच देण्यात आला आहे़ त्यामुळे त्यांनीच जिल्हा परिषदेतून काढलेल्या पत्राचा संदर्भ देऊन निवडणूक कामासाठी बीएलओ व अन्य कामासाठी घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात व त्या ऐवजी इतर राज्य शासकीय कर्मचाºयांची बीएलओ आणि इतर कामांसाठी नियुक्ती करून अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेश सर्व उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आणि तहसीलदार तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी यांच्या नावे काढले आहेत़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांची निवडणुकीच्या कामातून सुटका झाली आहे़विशेष म्हणजे या कामातून सुटका करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडून करण्यात येत होती़ त्यांची मागणी स्वत:च जि़प़च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांचा प्रभारी पदभार आल्यानंतर पूर्ण केली आहे़ त्यामुळे जि.प.च्या कर्मचाºयांमधून समाधान व्यक्त होत आहे.बीएलओंची जिल्हाधिकाºयांनी घेतली बैठक४मतदार पडताळणी कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातील बीएलओंची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली़ प्रभारी जिल्हाधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी यावेळी बीएलओंकडून कामांचा आढावा घेतला़४२६ जानेवारीपर्यंत हा कार्यक्रम राबविला जाणार असून, परभणी, गंगाखेड या तालुक्यांचे काम कमी असल्याने प्रभारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना बीएलओंना दिल्या़ तसेच इतर आवश्यक सूचनाही त्यांनी यावेळी केल्या़ या बैठकीस निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांचीही उपस्थिती होती़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकzpजिल्हा परिषद