शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आणखी एक झाड कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:23 IST

येथील स्टेशन रोड परिसरातील वस्तू आणि सेवा कर कार्यालया जवळील एक जुने झाड शुक्रवारी मध्यरात्री रस्त्यावर आडवे झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे स्टेशन रोड परिसरातील वाहतूक सकाळी १० वाजेपर्यंत खोळंबली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: येथील स्टेशन रोड परिसरातील वस्तू आणि सेवा कर कार्यालया जवळील एक जुने झाड शुक्रवारी मध्यरात्री रस्त्यावर आडवे झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे स्टेशन रोड परिसरातील वाहतूक सकाळी १० वाजेपर्यंत खोळंबली होती.येथील रेल्वेस्थानक परिसरामध्ये वस्तू आणि सेवा कर कार्यालय असून, या कार्यालयाच्या संरक्षक भिंत जवळ वडाची जुनी झाडं आहेत. शुक्रवारी मध्यरात्री शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. या वाºयामुळे स्टेशनरोडवरील वडाचे झाड रस्त्यावर आडवे झाले. त्यामुळे मध्यरात्रीपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर आडवे झालेले झाड बाजूला केले. साधारणत: पंचवीस-तीस वर्षांपूर्वीचे जुने झाड पडल्याने झाडांच्या संवर्धनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी सकाळी ११ वाजता शहरातील जायकवाडी भागात एक झाड कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर स्टेशन रोड भागात झाड पडल्याची घटना घडली.परभणी जिल्ह्यात वृक्षारोपण मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्याला १ कोटी १९ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. एकीकडे पावसाअभावी वृक्षारोपण मोहिमेत अडथळे निर्माण होत असताना दुसरीकडे वीस ते पंचवीस वर्षांपूवीर्ची जुनी झाडे जमीनदोस्त होत असल्याने जिल्हावासीयांच्या समोर ही एक नवी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आता वृक्षारोपणा बरोबरच जुन्या झाडांचे संवर्धन करण्याकडेही प्रशासनाला लक्ष द्यावे लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूकTrafficवाहतूक कोंडी