शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अहिल्याबाई होळकरनगरात घराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:24 IST

येथील एमआयडीसी भागातील अहिल्याबाई होळकर नगरातील एका घराला आग लागून किरायाने राहणाऱ्या पाच जणांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील एमआयडीसी भागातील अहिल्याबाई होळकर नगरातील एका घराला आग लागून किरायाने राहणाऱ्या पाच जणांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.एमआयडीसी भागातील अहिल्याबाई होळकरनगरमध्ये छायाबाई मुस्तागर यांचे निवासस्थान आहे. त्याला लागूनच मोकळ्या प्लॉटमध्ये टीन शेड व पार्टीशनच्या खोल्या किरायाने दिल्या आहेत.सोमवारी या सर्व घरांना कुलूप होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या घराला अचानक आग लागली. घरातून आगीचे लोट बाहेर पडत असल्याने शेजारील नागरिकांनी अग्नीशमन दलाला घटनेची माहिती दिली. काही वेळातच अग्नीशमन दलाचा बंब दाखल झाला. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात अग्नीशमनच्या कर्मचाऱ्यांना यश आले. दरम्यान, या आगीमध्ये पाचही घरांमधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.या घटनेमुळे या सर्व कुटूंबियांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.सिलिंडर काढल्याने टळला अनर्थ४आग लागलेल्या घरामध्ये सर्व किरायदारांकडे गॅस सिलिंडर होते. येथील नागरिकांनी तत्परता दाखवत या घरातील एक सिलेंडर बाहेर काढले तर अग्नीशमन दलाच्या कर्मचाºयांनी तीन सिलेंडर बाहेर काढल्याने अनर्थ टळलाचार लाख रुपयांचे नुकसान४दरम्यान, या प्रकरणी सचिन अशोक मुस्तागर यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.४अहिल्याबाई होळकर नगरात लागलेल्या आगीमध्ये जगदीश पांचाळ, विठ्ठल पांचाळ, श्याम कांबळे, राजाभाऊ कांबळे, भूजंग खंदारे यांच्या घरातील सोन्याचे दागिने, संसारोपयोगी साहित्य, टीव्ही, रेशनकार्ड, विमा कागदपत्रे आणि इतर महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली़ त्यामध्ये जगदीश पांचाळ, राजाभाऊ कांबळे यांच्या घरातील रोख रक्कमही जळून खाक झाली आहे़४या सर्व घटनेत सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सचिन मुस्तागर यांनी या तक्रारीत दिली असून, त्यावरून नवा मोंढा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीfireआग