शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कृषी विद्यापीठास १६४ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:01 IST

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संस्थांंतर्गत कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर बाबींसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशूसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने कृषी विद्यापीठाला १६४ कोटी ५५ लाख ८२ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास एका आदेशाद्वारे मंजुरी दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संस्थांंतर्गत कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर बाबींसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशूसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने कृषी विद्यापीठाला १६४ कोटी ५५ लाख ८२ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास एका आदेशाद्वारे मंजुरी दिली आहे़राज्यातील चार कृषी विद्यापीठे आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत कृषीविषयक शिक्षण संशोधन या मुख्य हेडखाली पीकसंवर्धन, पशू संवर्धन, मत्स्य व्यवसाय, निवृत्ती वेतन विषयक खर्च, वेतनेत्तर सहाय्यक अनुदान आणि वेतनाचे सहाय्यक अनुदान यासाठी राज्य शासनाकडून निधीची तरतूद करण्यात आली आहे़२०१८-१९ या वर्षासाठी या निधीची तरतूद केली होती़ त्यापैकी काही निधी यापूर्वी वितरितही केला होता़ २५ मार्च रोजी शासनाने एक अध्यादेश काढून सुधारित अंदाजानुसार अनुदान वितरित करण्यास मंजुरी दिली आहे़ त्यामध्ये परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठालाही निधी वितरित करण्याची तरतूद करण्यात आली आहे़ शासनाच्या या निर्णयानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला पीक संवर्धन या मुख्य हेडखाली २ कोटी १६ लाख ५९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती़ तसेच याच योजनेंतर्गत १७३ कोटी ६ लाख १६ हजार रुपयांची तरतूद होती़ त्यामध्ये २५ मार्च रोजी जारी केलेल्या आदेशानुसार निवृत्ती वेतन विषयक खर्चासाठी ६० कोटी १५ लाख ९२ हजार, वेतनेत्तर सहाय्यक अनुदानासाठी ६ कोटी ८१ लाख ८४ हजार, वेतनाच्या सहाय्यक अनुदानासाठी ८१ कोटी असा १४७ कोटी ९७ लाख ७६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे़ याच हेडखाली वेतनेत्तर सहाय्यक अनुदानासाठी ७ लाख ४ हजार, वेतनाच्या सहाय्यक अनुदानासाठी १ कोटी ६० लाख असा १ कोटी ६७ लाख ४ हजार रुपयांचा निधी विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. तर सर्वसाधारण या लेखाशीर्षाअंतर्गत निवृत्ती वेतन विषयक खर्चासाठी ३ कोटी ४४ लाख ३ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.सर्वसाधारण लेखाशीर्षामधील सुमारे १२० इतर संस्थांसाठी हा निधी असून, त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या अंशदानाच्या रकमेइतकी समतूल्य अंशदानाची रक्कम देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे़ हा निधी मंंजूर झाल्याने विद्यापीठातील रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे़ दरवर्षी विद्यापीठासाठी ही तरतूद केली जाते़ त्यानुसार यावर्षाअखेरीस कृषी विद्यापीठाला निधीचे वितरण झाले आहे़वेतनासह बांधकामांसाठीही अनुदानराज्य शासनाने २०१८-१९ या आर्थिक वर्षात सुधारित अंदाजानुसार वेतन, वेतनेत्तर अनुदान वितरित करण्यास मंजुरी दिली आहे़ त्याच प्रमाणे भांडवली मालमत्ता निर्मितीसाठीही अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे़ त्यामध्ये ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ त्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला वेतनेत्तर सहाय्यक अनुदानासाठी ९० लाख रुपयांचे मूळ अनुदान मंजूर होते़ तसेच भांडवली मालमत्तेच्या निर्मितीसाठी २ कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर आहे़ तर वेतनाच्या सहाय्यक अनुदानासाठी २ कोटी ३५ लाख रुपये मूळ अनुदान मंजूर आहे़ त्यामध्ये शासनाने सुधारित अंदाजानुसार वेतनेत्तर सहाय्यक अनुदानासाठी ७२ लाख रुपये वितरित केले आहे़ तर भांडवली मालमत्ता निर्मितीसाठी २ कोटी २० लाख आणि वेतनाच्या सहाय्यक अनुदानासाठी २ कोटी ६६ लाख ६ हजार रुपये निधी वितरणास मंजुरी दिली आहे़ तर पीकसंवर्धनासाठी वेतनेत्तर सहाय्यक अनुदान म्हणून ११ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे़ असा एकूण १६ कोटी ५८ लाख ६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठfundsनिधी