शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :पुन्हा बोंडअळीची धास्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:23 IST

परभणी आणि सेलू तालुक्यामध्ये कापसावर अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी आतापासूनच बोंडअळीची धास्ती घेतली आहे. कापसावर आढळणारी अळी नेमकी कोणती, अशी चर्चा कापूस उत्पादकांमध्ये होत असून शेतकºयांनी बोंडअळीची धास्ती घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी आणि सेलू तालुक्यामध्ये कापसावर अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी आतापासूनच बोंडअळीची धास्ती घेतली आहे. कापसावर आढळणारी अळी नेमकी कोणती, अशी चर्चा कापूस उत्पादकांमध्ये होत असून शेतकºयांनी बोंडअळीची धास्ती घेतली आहे.मागील वर्षी जिल्ह्यात बोंडअळीच्या प्रादूर्भावाने सर्वचच्या सर्व कापसाचे पीक फस्त झाले होते. शासनाला नुकसान भरपाई देखील द्यावी लागली होती. त्यानंतर यावर्षी कापूस लागवडीकडे शेतकºयांचा कल कमी झाला. असे असले तरी १ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. अनेक भागामध्ये या पिकांवर अळीचा प्रादूर्भाव दिसत आहे. परभणी, सेलू या दोन तालुक्यात हा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असून कापसावर निघालेली अळी ही बोंडअळीच असल्याची शेतकºयांची धारणा झाली आहे. त्यामुळे गतवर्षी प्रमाणेच यावर्षी नुकसान सहन करावे लागते की काय, अशी भितीही व्यक्त होत आहे. कापसाच्या पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. सेलू तालुक्यातील सिद्धनाथ बोरगाव येथे १० एकर क्षेत्रावरील कापूस पाळी घालून काढून टाकण्यात आला. कृषी विभागातील अधिकाºयांनीही घेतलेल्या प्रशिक्षण शिबिरात अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आतापासूनच शेतकºयांना मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.पात्यांमध्येच आढळल्या अळ्यापरभणी आणि सेलू तालुक्यात कापसाच्या पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव आढळत आहे. सध्या या तालुक्यातील कापसाचे पीक हे पाते आणि फुले लागवडीच्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी कापूस पात्या-फुलांमध्ये आला असून या पात्यांमध्येच अळी निघत असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. मागील वर्षी कापूस पिकाच्या बोंडामधून अळी निघत होती. हे बोंड परिपक्क्व होण्याच्या अवस्थेत असतानाच अळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट झाली होती.४कापसावर अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकºयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मागील वर्षी संपूर्ण पीक या अळीने नेस्तानाबुत केले होते. मागील वर्षी सारखीच परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी परिणामकारक कीटकनाशकांचा वापर होणे आवश्यक आहे. कापसावर प्रादूर्भाव झालेली ही अळी कोणती, याचा शोध घेऊन कृषी विभागाने शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरी