शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :पीडित महिलेच्या उपोषणानंतर विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:16 IST

पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेची छेड काढून, तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरुद्ध पीडितीने केलेल्या उपोषणानंतर १३ आॅक्टोबर रोजी पहाटे दीडच्या सुमारास पिंपळदरी पोलीस ठाण्यात विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेची छेड काढून, तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरुद्ध पीडितीने केलेल्या उपोषणानंतर १३ आॅक्टोबर रोजी पहाटे दीडच्या सुमारास पिंपळदरी पोलीस ठाण्यात विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.तालुक्यातील बडवणी येथील ३० वर्षीय महिला १८ सप्टेंबर रोजी साडेदहा ते अकराच्या सुमारास गावातील सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यासाठी गेली असता वैजनाथ बारिकराव मुंडे यांनी अंधाराचा फायदा घेत पिडीत महिलेची छेड काढून तिच्या सोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने आरडाओरड केल्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थ जमा होताच, जातीवाचक शिवीगाळ करून व जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने पळ काढला, अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यानंतरही पिंपळदरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही.त्यानंतर ११ व १२ आॅक्टोबर रोजी पीडित महिलेने गंगाखेड येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. त्यानंतर १३ आॅक्टोबर रोजी पहाटे दीडच्या सुमारास आरोपीविरुद्ध विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नंदलाल चौधरी हे करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाWomenमहिला