शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: दोन वर्षानंतरही शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीबाबत संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:36 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील केवळ २ लाख ३७ हजार ३१ शेतकऱ्यांना ८८६ कोटी ७२ लाख ९२ हजार ५५३ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ झाल्याची प्रशासनाची माहिती आहे़ परंतु, नेमक्या कोणत्या शेतकºयांना किती रुपयांची कर्जमाफी झाली? याबाबतचा संभ्रम शेतकºयांमध्ये दोन वर्षानंतरही कायम असल्याने लाभार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील केवळ २ लाख ३७ हजार ३१ शेतकऱ्यांना ८८६ कोटी ७२ लाख ९२ हजार ५५३ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ झाल्याची प्रशासनाची माहिती आहे़ परंतु, नेमक्या कोणत्या शेतकºयांना किती रुपयांची कर्जमाफी झाली? याबाबतचा संभ्रम शेतकºयांमध्ये दोन वर्षानंतरही कायम असल्याने लाभार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे़जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे़ २०१५-१६ या खरिप हंगामात बी-बियाणे, खते व औषधांची खरेदी करण्यासाठी शेतकºयांनी बँकेची दारे ठोठावली़ शेतकºयांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन बँकांनीही मोठ्या प्रमाणात शेतकºयांना पीक कर्जाच्या स्वरुपात आर्थिक मदत केली होती़ मात्र २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षातील खरीप व रबी हंगामात शेतकºयांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला़ या दोन्ही हंगामांतून जे काही उत्पन्न शेतकºयांच्या हाती लागले़ त्या शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळाला नाही़ त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक संकट अधिकच गंभीर बनले़ त्यामुळे या आर्थिक कोंडीतून जिल्ह्यातील शेतकºयांनी मृत्यूलाही जवळ केले़जिल्ह्यासह राज्यातील शेतकºयांची परिस्थिती पाहून राज्य शासनाने मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंमलात आणली़ या योजनेंतर्गत शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरणे बंधनकारक केले़ राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिवसरात्र एक करून महा- ई-सेवा केंद्र, सीएससी केंद्र व आॅनलाईन सेंटरच्या समोर शेतकºयांनी रांगा लावल्या व आपले फॉर्म भरून घेतले़ ही योजना अंमलात आणून दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे़ परंतु, अद्यापही जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी या योजनेबाबत समाधानी नाहीत़ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील २१ राष्ट्रीयकृत, खाजगी, जिल्हा मध्यवर्ती व महाराष्ट्र ग्रामीण या शाखेद्वारे २ लाख ३७ हजार ३१ शेतकºयांना ८८६ कोटी ७२ लाख ९२ हजार ५५३ रुपयांची कर्जमाफी दिल्याची माहिती आहे़ ज्या शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग झाली आहे व ज्याचे कर्ज माफ झाले आहे त्यांनाही पुसटशी कल्पना बँक प्रशासनाकडून देण्यात येत नसल्याने दोन वर्षानंतरही राज्य शासनाने सुरू केलेल्या कर्जमाफी योजनेबाबत शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था असल्याचे दिसून येत आहे़सरसकट कर्जमाफी देण्याची मागणीराज्य शासनाने सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकºयांतून होत आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष देऊन शेतकºयांना कर्जातून मुक्त करावे, अशीही मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी