शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
3
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
4
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
5
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
6
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
7
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
8
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
9
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
10
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
11
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
12
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
13
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
14
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
15
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
16
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
17
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
18
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
19
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
20
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली

परभणी : वेशांतर करुन पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:34 IST

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ८ मार्च रोजी कौसडी येथील आठवडी बाजारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वेशांतर करुन छापा टाकला. यात सहा जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ८ मार्च रोजी कौसडी येथील आठवडी बाजारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वेशांतर करुन छापा टाकला. यात सहा जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.कौसडी येथील आठवडी बाजारात जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना मिळाली. त्या आधारे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे व कर्मचाऱ्यांनी शेतकरी, ऊसतोड कामगार, व्यापारी, कीर्तनकार, गोंधळी असे वेश परिधान करुन एका खाजगी वाहनाने छापा टाकला. त्यावेळी गावातील आरोग्य केंद्रासमोर व मारोती मंदिरासमोरील सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले. या छाप्यात रमेश रामराव मोरे, तुळशीराम बाबूराव देशमुख, साहेबराव बाबाराव देशमुख, विनोद रामचंद्र ढवळशंख, दगडू लक्ष्मणराव नागनाथ (सर्व रा.कौसडी), गजानन (मटका बुकी मालक) अशा ६ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. जुगाराच्या साहित्यासह ३ हजार १० रुपये रोख, तीन मोबाईल असा ६ हजार १० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. हवालदार शिवाजी भोसले यांच्या फिर्यादीवरुन बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, हवालदार बाळासाहेब तुपसुंदरे, हनुमंत जक्केवाड, शिवाजी भोसले, लक्ष्मीकांत धुतराज, भगवान भुसारे, सय्यद मोईन, हरि खुपसे, सय्यद मोबीन आदींनी केली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी