शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आठ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना अत्याचारप्रकरणातील आरोपीला पकडण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:38 IST

बोरी येथील बालिकेवरील अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांनी जिद्दीने तपास करुन आरोपीचा शोध लावला. आठवडाभरात अनेक मार्ग अवलंबत अखेर तपासाची दिशा निश्चित झाली आणि आरोपी गळाला लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बोरी येथील बालिकेवरील अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांनी जिद्दीने तपास करुन आरोपीचा शोध लावला. आठवडाभरात अनेक मार्ग अवलंबत अखेर तपासाची दिशा निश्चित झाली आणि आरोपी गळाला लागला.१ नोव्हेंबर रोजी बोरी येथे एका सहा वर्षीय बालिकेवर अत्याचाराची घटना घडली. या घटनेमुळे जिल्हाभरात संताप व्यक्त केला जात होता. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडे अनेक राजकीय पक्ष, समाजसेवी संस्थांनी पाठपुरावा केला. त्यामुळे पोलिसांची जबाबदारी वाढली होती.या प्रकरणाचा तपास करीत असताना घटनास्थळावर कोणताच पुरावा हाती लागत नसल्याने पोलीसही हतबल झाले होते. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके स्थापन करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या अधिपत्याखालील पथकाने आरोपीची शोध मोहीम सुरु केली. मात्र पुरावा हाती लागत नसल्याने पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी इतर मार्गाचा अवलंब करावा लागला. त्यात बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संशयित ठिकाणे तपासण्यात आली. तसेच रेकॉर्डवरील गुन्ह्यांचीही माहिती जमा करण्यात आली. याच माहितीच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहचू शकले. आठवडाभरानंतर जिंतूर येथे पोलिसांना या प्रकरणातील आरोपी मिळून आला. परवेज खान रफीक खान पठाण (२२) यास मोटारसायकलसह पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर हा गुन्हा उघडकीस झाला. याकामी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, कापुरे, किशोर नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, शिवाजी देवकते, जमीर फारोखी, सय्यद मोईन, किशोर भूमकर, सय्यद मोबीन, मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसुंदरे, मधुकर पवार, शेख ताजोद्दीन, विशाल वाघमारे, दिलावर पठाण, शंकर गायकवाड, अरुण कांबळे, शंकर हाके, संतोष सानप, माया पैठणे आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :parabhaniपरभणीRapeबलात्कारPoliceपोलिस