लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत जिल्ह्यात १५ जुलै ते १३ आॅगस्ट या कालावधीत ५ हजार ९७९ नागरिकांना ८७९ दुकानदारांच्या माध्यमातून नवीन गॅस जोडणी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे यांनी दिली.राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने १५ जुलै ते २५ आॅगस्ट या कालावधीत पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत धूरमुक्त आणि गॅसयुक्त महाराष्ट्र संकल्प अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या अभियानांतर्गत गॅस जोडणी नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना मोफत गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने जुलै महिन्याच्या प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व गॅस एजन्सीधारक आणि एचपीसीएल, बीपीसीएल, आयवोसीएल या कंपनीचे जिल्हा विक्री अधिकारी, सर्व तहसीलदार आदींची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत रेशन दुकानदारांकडून/ केरोसीन विक्रेत्यांकडून अनुदानित केरोसीन मिळविण्यासाठी सादर केलेल्या हमीपत्र शिधापत्रिकाधारकांकडून केवायसी फॉर्म भरुन घेण्याचे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार ६० हजार १६१ शिधापत्रिकाधारकांनी हमीपत्र भरुन दिले. त्यानंतर ज्या कुटुंबियांकडे गॅस नाही, त्यांना गॅस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातून एकूण २० हजार ३२३ रेशनकार्डधारकांनी नवीन गॅस जोडणीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी १८ हजार ९२८ अर्ज गॅस एजन्सीकडे नवीन जोडणीसाठी पुरवठा विभागाने हस्तांतरीत केले. त्यापैकी परभणी तालुक्यातील १ हजार ३८१, पालम तालुक्यातील २६४, पूर्णा तालुक्यातील १६९, गंगाखेड तालुक्यातील ३२५, सोनपेठ तालुक्यातील १५४, सेलू तालुक्यातील ८७३, पाथरी तालुक्यातील १०४, जिंतूर तालुक्यातील १ हजार ३०८ आणि मानवत तालुक्यातील १ हजार ४०१ अशा ५ हजार ९७९ शिधापत्रिकाधारकांना नवीन गॅसची जोडणी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे यांनी दिली. आता गॅस एजन्सीकडे एकूण १२ हजार ९४९ अर्ज नवीन जोडणीसाठी प्रलंबित आहेत. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ६ हजार ३०७ अर्ज परभणी तालुक्यातील असून जिंतूर तालुक्यातील २ हजार १८, पालम तालुक्यातील १ हजार ५९०, पूर्णा ८५३, गंगाखेड ३७७, सोनपेठ ४३७, सेलू १६०, पाथरी १ हजार ८३ आणि मानवत तालुक्यातील १२४ अर्जांचा समावेश आहे.६० हजार : रेशनकार्डधारकांचे हमीपत्र४गॅसचा वापर करीत नाही, असे जिल्ह्यातील ६० हजार १६१ रेशन कार्डधारकांनी पुरवठा विभागाकडे हमीपत्र दिले आहे. त्यामध्ये परभणी तालुक्यातील ९ हजार ८३, पालम तालुक्यातील ७ हजार ८३३, पूर्णा तालुक्यातील ६ हजार १२१.४ गंगाखेड तालुक्यातील ३ हजार ७५, सोनपेठ तालुक्यातील ६ हजार ३०९, सेलू तालुक्यातील ६ हजार ५२४, पाथरी तालुक्यातील ६ हजार ३९२, जिंतूर तालुक्यातील ९ हजार ९८३ आणि मानवत तालुक्यातील ४ हजार ८४१ रेशनकार्डधारकांचा समावेश आहे.८७९ दुकानदारांनाअर्ज वाटप४पुरवठा विभागाच्या वतीने नवीन गॅस जोडणीसाठी जिल्ह्यातील ८७९ रेशन दुकानदारांना अर्ज वितरित केले. त्यामध्ये परभणी तालुक्यातील १७९, पालम तालुक्यातील ११४, पूर्णा तालुक्यातील १२५, गंगाखेड तालुक्यातील ४९.४ सोनपेठ १९, सेलू १००, पाथरी ७२, जिंतूर १८१ आणि मानवत तालुक्यातील ८० दुकानांचा समावेश आहे.
परभणी : महिनाभरात सहा हजार नागरिकांना गॅस जोडण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 23:48 IST