शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ८७ केरोसिन परवानाधारकांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 23:47 IST

पुरवठा विभागाने दिलेल्या रॉकेलच्या वितरणात अनियमितता केल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील ८७ किरकोळ केरोसीन परवानाधारक दोषी आढळले असून, त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पुरवठा विभागाने दिलेल्या रॉकेलच्या वितरणात अनियमितता केल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील ८७ किरकोळ केरोसीन परवानाधारक दोषी आढळले असून, त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली़जिंतूर तालुक्यात रॉकेल नियतन वितरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा प्रकार आॅगस्ट महिन्यात उघडकीस आला होता़ या प्रकरणी चौकशीच्या मागणीसाठी येलदरी येथील अर्धघाऊक विक्रेते श्यामसुंदर सारडा यांनी २ आॅक्टोबरपासून जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरू केले होते़ त्यानंतर या प्रकरणी पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या नायब तहसीलदारांची चार चौकशी पथके स्थापन करण्यात आली होती़३ ते ५ आॅक्टोबर या कालावधीत या पथकाने तालुक्यातील सर्व किरकोळ केरोसीन परवानाधारक विक्रेत्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली़ त्यामध्ये ८७ किरकोळ केरोसीन परवानाधारक विक्रेत्यांनी अनियमितता केल्याचे उघडकीस आले़चार पैकी तीन पथकांचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे़ एका पथकाचा अहवाल मंगळवारपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे़ चारही पथकांच्या एकत्रित अहवालानंतर दोषी ८७ किरकोळ केरोसीन वितरकांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे़या नोटिसीनंतर समाधानकारक कारण नसल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे पुरवठा विभागातील सूत्रांकडून समजले़ त्यामुळे आता या प्रकरणी काय कारवाई होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़अधिकाऱ्यांना अभय कायमपुरवठा विभागाच्या वतीने एकाच बाजुने तपास केला जात आहे़ केरोसीन वितरणात काही वितरक दोषी असले तरी त्यांना अधिकचे केरोसीन वितरित करणाºया अधिकाºयांना मात्र जिल्हा प्रशासनाने मोकाट सोडले आहे़ नियमबाह्य केरोसीन वितरित केले नसते तर अनियमितताच झाली नसती़ त्यामुळे चुकीच्या पद्धतीने केरोसीन वितरित करणाºया वितरकांपेक्षा त्यांना नियतन मंजूर करणारे अधिकारी अधिक दोषी आहेत़ परंतु, अधिकाºयांना बाजुला करून फक्त वितरकांवरच कारवाई करण्याची मोहीम सध्या जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे़ त्यामुळे प्रशासनाच्या या एकतर्फी कारवाईबद्दल शंका उपस्थित केली जात आहे़श्यामसुंदर सारडा यांचे उपोषण मागेजिंतूरच्या अनियमित रॉकेल वितरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी २ आॅक्टोबरपासून बेमुदत उपोषणास बसलेले अर्धघाऊक केरोसीन वितरक श्यामसुंदर सारडा यांनी ८ आॅक्टोबर रोजी उपोषण मागे घेतले़ सोमवारी राज्याचे नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांचे विशेष कार्यकारी अधिकारी शेख यांनी दूरध्वनीवरून सारडा यांच्याशी चर्चा केली़ त्यात त्यांनी परभणी जिल्हा पुरवठा अधिकाºयांशी या प्रकरणी बोलणी झाली असून, त्यांच्या म्हणण्यानुसार ८७ किरकोळ परवानाधारकांवर कारवाई प्रस्तावित केली आहे़ डिलर व अधिकारी यांची चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले़ आठ दिवसांत चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत सारडा यांना कळविले जाईल, त्यामुळे उपोषण मागे घेण्यात यावे, असे शेख यांनी सारडा यांना सांगितले़ त्यावरून सारडा यांनी आठ दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीTahasildarतहसीलदार