शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
3
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
4
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
5
Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
6
'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
7
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
8
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
9
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
10
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
11
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
12
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
13
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
14
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
15
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
16
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
17
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
18
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
19
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
20
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : २७ कोटी ३५ लाखांचा कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:41 IST

यावर्षीच्या उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्व तयारी सुरू केली असून, त्या अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ६७ गावे आणि १८३ वाड्यांमध्ये टंचाई निर्माण झाल्यास उपाययोजना करण्यासाठी २७ कोटी ३५ लाख ९७ हजार रुपयांचा कृती आराखडा विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्व तयारी सुरू केली असून, त्या अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ६७ गावे आणि १८३ वाड्यांमध्ये टंचाई निर्माण झाल्यास उपाययोजना करण्यासाठी २७ कोटी ३५ लाख ९७ हजार रुपयांचा कृती आराखडा विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे़जिल्ह्यात मागील वर्षीच्या पावसाळ्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला़ त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईच्या झळा मागील वर्षीच्या तुलनेत तेवढ्या तीव्र जाणवणार नसल्या तरी ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होवू शकते़ ही शक्यता लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत़ उन्हाळ्यात पाणी पातळी खालावणे, सार्वजनिक हातपंप, विहिरींचे पाणी आटणे आणि प्रकल्पांतील पाणीसाठा कमी होवून टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते़ अशा वेळी जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी संभाव्य कृती आराखडा तयार केला जातो़ यावर्षीही जिल्हा परिषद, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या अहवालावरुन संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ हा आराखडा जानेवारी ते जून २०२० याप्रमाणे ६ महिन्यांचा करण्यात आला आहे़ त्यात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात पाणीटंचाई निर्माण झाली तर त्यासाठी एकूण ७८६ योजना तयार करण्यात आल्या आहेत़ त्यावर साधारणत: १५ कोटी ७ लाख ९० हजार रुपयांचा खर्च होईल, असे प्रशासनाला अपेक्षित आहे़एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी ४७२ योजनांची आखणी केली असून, त्यावर १२ कोटी २८ लाख ७ हजार रुपये खर्च होण्याचे अपेक्षित धरले आहे़ जिल्हा प्रशासनाने हा कृती आराखडा विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे़ सद्यस्थितीला जिल्ह्यात पाणीटंचाई उद्भवलेली नाही़ मात्र भविष्यात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होवू शकते, अशा वेळी या कृती आराखड्यातून टंचाईची कामे केली जाणार आहेत़जिंतूर तालुक्यासाठी सर्वाधिक तरतूद४जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईचा आराखडा तयार करताना तालुकानिहाय आढावा घेतला आहे़ त्यात जिंतूर तालुक्यासाठी सर्वाधिक ४ कोटी ८९ लाख १८ हजार रुपयांची तरतूद केली आहे़४या तालुक्यातील १६९ गावे आणि २६ वाड्यांमध्ये टंचाई निर्माण झाली तर त्यासाठी १९७ योजनांची आखणी केली आहे़ त्याच प्रमाणे पूर्णा तालुक्यातील १९५ गावे आणि ४ वाड्यांसाठी ४ कोटी १ लाख ८४ हजार रुपयांची तरतूद केली आहे़४गंगाखेड तालुक्यातील ११० गावे आणि ५६ वाड्यांसाठी ३ कोटी ५१ लाख ९४ हजार, परभणी तालुक्यात १६१ गावे व २४ वाड्यांसाठी ३ कोटी ४१ लाख ४५ हजार रुपयांची तरतूद केली आहे़४सेलू तालुक्यातील १२७ गावे आणि ६ वाड्यांसाठी ३ कोटी १९ लाख १८ हजार, पालम तालुक्यातील १०७ गावे आणि ४३ वाड्यांसाठी ३ कोटी १३ लाख १७ हजार, मानवत तालुक्यातील ८१ गावे आणि ३ वाड्यांसाठी १ कोटी ९५ लाख ८२ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़४ सोनपेठ तालुक्यातील ७९ गावे आणि १० वाड्यांसाठी १ कोटी ९० लाख ३९ हजार, पाथरी तालुक्यातील ३८ गावे आणि ११ वाड्यांसाठी १ कोटी ३३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ त्यामुळे प्रशासनस्तरावर उन्हाळ्याचे नियोजन सुरू असल्याचे दिसून येते़...या योजना प्रशासन राबविणार४ग्रामीण भागात टंचाई निर्माण झाल्यास नवीन विंधन विहिरी घेणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पुरक योजना, टँकरद्वारे पाणीपुरवठा आदी कामे केली जाणार आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी