शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : डिजिटल सातबाराचे ९६ टक्के काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 23:48 IST

शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा कोणत्याही परिस्थितीमध्ये उपलब्ध झालीच पाहिजे, त्या अनुषंगाने तालुक्यात डिजीटल स्वाक्षरीच्या संगणकीकृत सातबारासाठी डाटा अपलोडची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा कोणत्याही परिस्थितीमध्ये उपलब्ध झालीच पाहिजे, त्या अनुषंगाने तालुक्यात डिजीटल स्वाक्षरीच्या संगणकीकृत सातबारासाठी डाटा अपलोडची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे.तालुक्यात १४०९३ सातबारांची संख्या असून त्यापैकी १३ हजार ५४२ सातबारा आॅनलाईन झाल्या आहेत. उर्वरित ५५१ सातबारा आॅनलाईन करण्याच्या सूचना तलाठ्यांना देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील संपूर्ण सातबारा डिजिटल स्वाक्षरीने संगणकीकृत होणार आहेत. कोणत्याही शेतकºयास आपली सातबारा आॅनलाईन पाहता येणार आहे. तसेच त्या सातबाराची प्रिंटही काढता येणार आहे. त्यामुळे तलाठ्यांकडे किंवा तहसीलमध्ये जाण्याचा वेळ वाचणार आहे.यापूर्वी केवळ सातबारासाठी शेतकऱ्यांना विविध कामे सोडून तहसील कार्यालय व तलाठ्याकडे चकरा माराव्या लागत होत्या. आता ही गैरसोय डिजिटल सातबारामुळे दूर होणार आहे. शेतकºयांना लवकरच तालुक्यात कोठेही डिजिटल सातबारा उपलब्ध होणार आहेत.दरम्यान, तहसील प्रशासनाकडून डिजिटल सातबारा तयार करण्याचे काम ९६ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित ४ टक्के काम पूर्ण करण्यासाठी महसूल प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.तांत्रिक अडचणींचा करावा लागणार सामनाशासनाच्या निर्देशानुसार शेतकºयांना संगणकीकृत सातबारा मिळाव्यात, यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. सोनपेठ तालुका प्रशासनानेही शासनाच्या आदेशाचे पालन करीत व तालुक्यातील शेतकºयांना डिजिटल साताबारा मिळाव्यात यासाठी दिवस-रात्र काम करून संगणकीय सातबारा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र सोनपेठ तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट चालत नाही. त्यामुळे आॅनलाईन सेवा ठप्प होते. अशा वेळी सातबारा मिळविण्यासाठी शेतकºयांना तालुक्याच्या ठिकाणीच यावे लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी