शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: ५६ घरकुलांच्या विक्रीस मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:35 IST

पूर्णा तालुक्यातील निळा येथील पूरग्रस्तांच्या पूनर्वसनानंतर शिल्लक राहिलेल्या एकूण ५६ घरकुलांची बाजारभावानुसार विक्री करण्यास शासनाची परवानगी मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पूर्णा तालुक्यातील निळा येथील पूरग्रस्तांच्या पूनर्वसनानंतर शिल्लक राहिलेल्या एकूण ५६ घरकुलांची बाजारभावानुसार विक्री करण्यास शासनाची परवानगी मिळाली आहे.पूर्णा तालुक्यातील निळा या गावाचे पूनर्वसन झाले असून पूनर्वसित ठिकाणी घरकुलांची उभारणी करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांना घरकुल वितरित केल्यानंतर काही घरकुले शिल्लक राहिली असून त्यात १ हजार ५०० चौरस फूट भूखंडावरील ४७ आणि १ हजार चौरस फुटावरील ९ अशा ५६ घरकुलांचा समावेश आहे. या घरकुलांची बाजारभावानुसार विक्री करण्यास शासनाची परवानगी मिळाली आहे.पूनर्वसनांतर्गत बांधलेली ही घरकुले निळा व परिसरातील रहिवासी असलेल्या कुटुंबप्रमुखांना निविदा सादर करण्यासाठी खुली आहे. चालू बाजारभावानुसार घरकूल विक्री करताना उपलब्ध घरकुलापेक्षा जास्त मागणी अर्ज प्राप्त झाल्या लॉटरी पद्धतीने घरकुलांचे वाटप करण्यात येईल.१ हजार ५०० चौरस फुटासाठी बाजारमूल्याप्रमाणे ११ लाख ५७ हजार ३७६ तर १ हजार चौरस फुटासाठी ११ लाख २ हजार ५६ किंमतीचे घर व भूखंड मंजूर केला जाईल. घर मंजूर झालेल्या व्यक्तीस १५ दिवसांच्या आत रक्कम शासनास जमा करावी लागेल.४निविदेसोबत रहिवासी असल्याचा पुरावा सादर करणे बंधनकारक राहणार आहे. निविदा भरताना १ हजार ५०० चौरस फुटासाठी १० टक्के म्हणजे १ लाख १५ हजार ७३६ रुपये व १ हजार चौरस फुटासाठी १ लाख १० हजार २०५ रुपयांचा धनादेश जिल्हा पूनर्वसन अधिकारी यांच्या नावाने जोडावा लागेल. अधिक माहितीसाठी जिल्हा पूनर्वसन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीHomeघरGovernmentसरकार