शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

परभणी : ६६.२७ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 00:41 IST

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत सरासरी ६६.२७ टक्के मतदान झाले. सर्वाधिक म्हणजे तब्बल ७२ टक्के मतदान जिंतूर विधानसभा मतदारसंघात झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत सरासरी ६६.२७ टक्के मतदान झाले. सर्वाधिक म्हणजे तब्बल ७२ टक्के मतदान जिंतूर विधानसभा मतदारसंघात झाले.परभणी विधानसभा मतदारसंघात सरासरी ६०.९२ टक्के मतदान झाले. २०१४ च्या तुलनेत मतदारसंघातील आकडेवारी घसरली आहे. गेल्यावेळी येथे ६४.२० टक्के मतदान झाले होते. परभणी शहरातील अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. परभणी ते मानवत रोड रेल्वेमार्गावरील मोहपुरी शिवारातील रेल्वेखाली पाणी साचल्याने मोहपुरी व गव्हा येथील नागरिकांना मतदानासाठी पान्हेरा येते जाताना अडचण आली.जिंतूर विधानसभा मतदारसंघात मतदानाचे रेकॉर्ड झाले. २०१४ मध्ये या मतदारसंघात ६८.३२ टक्के मतदान झाले होते. २०१९ मध्ये तब्बल ७२ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात चार मतदारसंघाच्या तुलनेत या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघात सरासरी ६८.५० टक्के मतदान झाले. २०१४ मध्ये या मतदारसंघात ६६.४८ टक्के मतदान झाले होते. येथे मतदानाचा टक्का वाढल्याचे पाहावयास मिळाले. या मतदारसंघातील पाथरी, मानवत, सोनपेठ शहरांसह ग्रामीण भागातील मतदान केंद्रावरही मतदारांच्या रांगा पाहावयास मिळाल्या. सोनपेठ तालुक्यातील गोदावरील काठावरील लासीना, थडी उक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव या गावांनी रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ६३.२९ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात २०१४ मध्ये ६३.५७ टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघातील बनवस, सिरसम, नाव्हा, पांगरी लासीना या गावांमधील मतदान केंद्रासमोर सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत मतदान चालले. सायंकाळी ६ पूर्वी हे सर्व मतदार केंद्रामध्ये दाखल झाले होते. त्यामुळे त्यांना टोकन देण्यात आले. त्यानंतर त्यांनी मतदान केले. दरम्यान, मतदारांनी अर्ज केला नसतानाही त्यांची नावे टपाली मतपत्रिकेच्या यादीत आल्याचा प्रकार परभणी व गंगाखेडमध्ये पहावयास मिळाला. यावरुन मतदार व अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली.

टॅग्स :parabhaniपरभणीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019