शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :४४८ गावांमध्ये यावर्षी देणार जमीन आरोग्य पत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:41 IST

मृद आरोग्य अभियानांतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ४४८ गावांमधील १ लाख ८४ हजार ३८६ शेतकºयांना त्यांच्या जमिनीची आरोग्यपत्रिका देण्याचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मृद आरोग्य अभियानांतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ४४८ गावांमधील १ लाख ८४ हजार ३८६ शेतकºयांना त्यांच्या जमिनीची आरोग्यपत्रिका देण्याचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिली.रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी करुन मृद तपासणीवर आधारित अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलीत व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मृद आरोग्य सुधारण्यासाठी आणि मूलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रीय खते, गांडूळ खत, निंबोळी/ सल्फर अच्छादित युरिया सारख्या संथगतीने नत्र पुरवठा करणाºया खतांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी मृद आरोग्य अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.२०१४-१५ ते २०१७-१८ या तीन वर्षामध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ५० टक्क्यांचा आर्थिक सहभाग आहे. योजनेचे नियोजन व अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. या अनुषंगाने माहिती देताना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर म्हणाले की, जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ४४८ गावांची मृद चाचणी व मृद आरोग्य पत्रिका वाटपासाठी निवड करण्यात आली असून या गावांमधील १ लाख ८४ हजार ३८६ शेतकºयांना या जमिनीच्या आरोग्य पत्रिका दिल्या जाणार आहेत. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील ४०० गावांची निवड करण्यात येणार असून त्यामधील १ लाख ८३ हजार ५२२ शेतकºयांना जमीन आरोग्यपत्रिका दिली जाणार आहे.मृद आरोग्यपत्रिकेत जमिनीचे आरोग्य म्हणजेच त्यातील घटकांची मात्रा सांगितली जाणार आहे. सुपिकता पातळीनुसार रासायनिक व सेंद्रीय खतांची मात्रा किती प्रमाणात वापरावी, याचेही या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.जमिनीत येणार सुपिकताखरीप व रब्बी हंगामातील पिकांना शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक खते व औषधांची मात्रा देण्यात येत आहे. त्यामुळे जमिनीतील सुपिकतेमध्ये गेल्या काही वर्षांपासून घट होत आहे. परंतु, कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक शेतकºयांच्या जमिनीची मृद तपासणी करुन आरोग्य पत्रिका देण्यात येणार आहे. या पत्रिकेत पिकांना लागणाºया रासायनिक खतांचे मोजमाप देण्यात येणार आहे. त्यामुळे अवाजवी रासायनिक खतामुळे घटत चाललेली जमिनीची सुपिकता या आरोग्य पत्रिकेमुळे वाढणार असल्याचे शेतकºयांतून बोलले जात आहे.