शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ४३० घरे उजळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:03 IST

येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने प्रधानमंत्री सौभाग्य योजनेंतर्गत तालुक्यातील ४३० घरांना नव्याने वीज जोडणी देण्यात येणार आहे. महावितरण कंपनीने १५ आॅक्टोबरपर्यंत ३७२ घरांना वीज जोडणी दिली आहे. उर्वरित ५८ घरातील वीज जोडणीचे काम प्रगतीपथावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्केंसोनपेठ (परभणी ) : येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने प्रधानमंत्री सौभाग्य योजनेंतर्गत तालुक्यातील ४३० घरांना नव्याने वीज जोडणी देण्यात येणार आहे. महावितरण कंपनीने १५ आॅक्टोबरपर्यंत ३७२ घरांना वीज जोडणी दिली आहे. उर्वरित ५८ घरातील वीज जोडणीचे काम प्रगतीपथावर आहे.वीज वितरण कंपनीच्या वतीने शहरातील ३३ के.व्ही. उपकेंद्रांतर्गत ग्रामीण भागात वीजपुरवठा केला जातो; परंतु, आजही अनेक ग्राहकांकडे अधिकृत वीज जोडणी नाही. त्यामुळे वीज चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात तालुक्यात दिसून येते.यावर प्रतिबंध घालण्यासाठी व महाविरणच्या उत्पादनात भर टाकण्यासाठी त्याच बरोबर ग्रामीण सर्वसामान्य कुटुंबाला अधिकृत वीज जोडणी मिळावी, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री सौभाग्य योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत दुर्बल घटकातील कुटुंबांना वीज जोडणी देण्यात येत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील ग्राहकांचे ४३० वीज जोडणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ३७२ कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. उर्वरित ५८ वीज ग्राहकांना वीज जोडणी देण्याचे काम प्रगतीपथावर आहे.जिल्ह्याला ८ हजार ११७ : वीज जोडणीचे उद्दिष्टप्रधानमंत्री सौभाग्य योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यासाठी ४ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध देण्यात आला आहे. त्यामधून ८ हजार ११७ दारिद्रय रेषेखालील ग्राहकांना वीज जोडणी देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.यासाठी ६ डिसेंबर २०१७ रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत. आतापर्यंत ६ हजार ९३१ वीज जोडण्या पूर्ण करण्यात आल्या असल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. अजूनही जवळपास १ हजार वीज जोडणी देणे बाकी आहे. त्यामुळे ज्या कंत्राटदाराला या सौभाग्य योजनेंतर्गत कंत्राट मिळाले आहे, त्या कंत्राटदाराने लवकरात लवकर या वीज जोडण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी वीज ग्राहकांमधून केली जात आहे.लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याची गरजवीज वितरण कंपनीच्या वतीने सौभाग्य योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना मोफत वीज जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सोनपेठ तालुक्यात प्रत्यक्ष संबंधित लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे का? याचे महावितरणच्या वतीने सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी सोनपेठ तालुक्यातील लाभार्थ्यांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण