शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

परभणी : सात महिन्यांत ४ हजार जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:17 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी व रक्त विघटन केंद्राकडे जानेवारी ते जुलै या सात महिन्यात ४ हजार ३५६ जणांनी रक्तदान केले आहे. त्यामुळे रक्तपेढी व रक्त विघटन केंद्रांकडून रुग्णांना रक्त पिशव्यांचे वितरण करताना सोयीचे झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी व रक्त विघटन केंद्राकडे जानेवारी ते जुलै या सात महिन्यात ४ हजार ३५६ जणांनी रक्तदान केले आहे. त्यामुळे रक्तपेढी व रक्त विघटन केंद्रांकडून रुग्णांना रक्त पिशव्यांचे वितरण करताना सोयीचे झाले आहे.शस्त्रक्रिया, बाळांतपणातील अति रक्तस्त्राव, अपघातात जखमी झालेले रुग्ण, हिमोफिलिया, थॅलेसेमिया आदींना रक्ताची नितांत आवश्यकता असते. या रुग्णांना रक्त देण्यासाठी नातेवाईक रक्तपेढीकडे धाव घेतात; परंतु, काही वेळेस या रुग्णांना रक्त पिशव्यांच्या तुटवड्यामुळे रक्त मिळू शकत नाही. परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय रक्तपेढी आहे. या रक्तपेढीतून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात रक्त पिशव्यांचा पुरवठा केला जातो. याच बरोबर जीवनअमृत सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील रुग्णांनाही लाभ दिला जातो. त्यामुळे ज्या रुग्णांना रक्ताची गरज भासते, त्या सर्व रुग्णांचा भार या रक्तपेढीवर असतो. जानेवारी ते जुलै या सात महिन्यात रक्तपेढी व रक्त विघटन केंद्राकडून जिल्ह्यात वेगवेगळ्या ८२ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरातून ३ हजार ९९ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. त्याच बरोबर जिल्ह्यातील १ हजार २५७ इच्छुक रक्तदात्यांनी रक्तपेढीमध्ये जावून रक्तदान केले. अशा ४ हजार ३५६ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. यामध्ये ३ हजार ४९८ रुग्णांना रक्त पिशव्यांचे वाटप करण्यात आले. ९६१ रुग्णांना रक्तघटक देण्यात आले. ११२ थॅलेसेमिया रुग्णांना ५१२ रक्ताचा पुरवठा करण्यात आला. तर जीवनअमृत सेवाअंतर्गत जिल्ह्यातील २५ रुग्णालयात ५९६ रुग्णांना सेवा देण्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणीBlood Bankरक्तपेढी