शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

परभणी : मानवतमध्ये हॉटेलसह ४ दुकाने खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:54 IST

शहरातील आठवडे बाजार परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एका हॉटेलसह अन्य चार दुकाने जळून खाक झाली. हॉटेल मालक किरकोळ जखमी झाला असून यामध्ये जिवित हानी झाली नाही. या घटनेमुळे जवळपास ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना २८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : शहरातील आठवडे बाजार परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एका हॉटेलसह अन्य चार दुकाने जळून खाक झाली. हॉटेल मालक किरकोळ जखमी झाला असून यामध्ये जिवित हानी झाली नाही. या घटनेमुळे जवळपास ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना २८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.शहरातील आठवडे बाजार परिसरात असलेल्या शिवशंकर हॉटेलमधील गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे हॉटेलला आग लागून जळून खाक झाले. त्याच बरोबर बाजूच्या दुकानातंही आग लागल्याने हॉटेलच्या बाजुच्या एका मोबाईल शॉपी, टेलरच्या दुकानानेही पेट घेतला. या घटनेत चार दुकाने जळून खाक झाली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या अग्नीशामक दलासह पाथरीहून अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले. सकाळी १० वाजता आगीवर नियंत्रण मिळवित आग विझविण्यात आली. सोमवार हा बाजाराचा दिवस होता, मात्र आग सकाळी लागल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेत हॉटेलमालक भास्कर काळे यांचे हात भाजल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे, डॉ. अंकूश लाड, अनंंत भदर्गे, यश कत्रुवार, अनंत गोलाईत, बालाजी दहे, सपोनि प्रवीण दिनकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तहसीलदार डी.डी. फुफाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. मंडळ अधिकारी सुरवसे यांनी झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगhotelहॉटेल