शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

परभणी : ३२ कोटींचा निधी शासनाला समर्पित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:21 IST

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीटीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करीत ५८ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. मात्र प्रत्यक्षात नुकसानीचा आकडा कमी असल्याने शिल्लक राहिलेले ३२ कोटी २४ लाख रुपये शासनाला समर्पित करण्यात आले आहेत.

प्रसाद आर्वीकर।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीटीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करीत ५८ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. मात्र प्रत्यक्षात नुकसानीचा आकडा कमी असल्याने शिल्लक राहिलेले ३२ कोटी २४ लाख रुपये शासनाला समर्पित करण्यात आले आहेत.११, १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. यात गहू, ज्वारी या हंगामी पिकांबरोबरच फळबागांचेही नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी चांगलाच संकटात सापडला होता. अशा संकटग्रस्त शेतकºयांना तातडीने मदत करता यावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने दुसºयाच दिवशी पंचनामे केले. यात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सेलू, सोनपेठ, गंगाखेड, जिंतूर, पूर्णा आणि पालम या सहा तालुक्यात गारपीटीमुळे ६६ हजार ८८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त करीत नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी ५८ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी विभागीय आयुक्तांकडे नोंदविली होती.त्यानुसार जिल्हा प्रशासनाला ही रक्कम प्राप्त झाली. मदतीचे वाटप करताना नुकसानग्रस्त शेतकºयांच्या प्रत्यक्ष नुकसानीचा आकडा काढून मदत वाटप करण्यात आली. जिंतूर तालुक्यात गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी प्रशासनाला १ कोटी १३ लाख ८८ हजार रुपये प्राप्त झाले होते. २९ मार्चपर्यंत ३५५४ शेतकºयांना ही संपूर्ण रक्कम गारपीट नुकसानीपोटी वितरित करण्यात आली. सेलू तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी १० कोटी ६ लाख २२ हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाली होती. तालुक्यातील २७ हजार ३९९ शेतकºयांचे गारपीटीने नुकसान झाले होते. या शेतकºयांना ७ कोटी २ लाख ८१ हजार रुपये, सोनपेठ तालुक्यासाठी १ कोटी ८४ लाख ९ हजार रुपये प्राप्त झाले. त्यातून २३४ शेतकºयांना २६ लाख ४ हजार रुपये, गंगाखेड तालुक्यासाठी १३ कोटी ७६ लाख ९० हजार रुपये प्राप्त झाले होते. प्रत्यक्षात ४ हजार ७६९ शेतकºयांना २ कोटी २५ लाख ९३ हजार रुपये मदत वाटप करण्यात आली. पालम तालुक्यास गारपीट नुकसानीच्या मदतीसाठी २१ कोटी ८२ लाख ४० हजार रुपये प्राप्त झाले होते. त्यातून १७१४१ शेतकºयांना ७ कोटी ८२ लाख ४४ हजार रुपये आणि पूर्णा तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या ९ कोटी ६९ लाख १ हजार रुपयांच्या रकमेतून ११ हजार १५७ शेतकºयांना ७ कोटी ५६ लाख ५८ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.गारपीट नुकसानीसाठी तातडीने मदत मागविणे आवश्यक असल्याने जिल्हा प्रशासनाने अंदाजित पंचनामे करीत मदत निधीची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात मदत वाटप करीत असताना नुकसानीचा आकडा कमी असल्याने २६ कोटी ७ लाख ६८ हजार रुपयांची मदत ६४ हजार २५४ शेतकºयांना वाटप करण्यात आली. उपलब्ध रक्कमेपैकी ३२ कोटी २४ लाख ८२ हजार रुपयांची रक्कम शिल्लक राहिल्याने ती शासनाला समर्पित करण्यात आली.पालम तालुक्यात सर्वाधिक नुकसान११, १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यामध्ये गारपीट झाली होती. या गारपीटीत पालम तालुक्यामध्ये २४ हजार ९२८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ५० टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले होते. त्यामुळे गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी २१ कोटी ८२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तालुका प्रशासनाने १७ हजार १४१ शेतकºयांना ७ कोटी ८२ लाख ४४ हजार रुपयांची मदत वाटप केली आहे. तसेच सेलू तालुक्यामध्ये ६२५ हेक्टरवरील पिकांचे ५० टक्केपेक्षा अधिक तर ११ हजार ४४१ हेक्टरवरील पिकांचे ३३ ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले होते. या तालुक्यासाठी १० कोटी ६ लाख २२ हजार रुपये मदत मागविण्यात आली. प्रत्यक्षात २७ हजार ३९९ शेतकºयांना ७ कोटी २ लाख ८१ हजार रुपये मदतीचे वाटप करण्यात आले. सोनपेठ तालुक्यात २६ लाख ४ हजार, गंगाखेड २ कोटी २५ लाख ९३ हजार तर पूर्णा तालुक्यात ७ कोटी ५६ लाख ५८ हजार रुपयांची मदत गारपीटग्रस्तांना वाटप करण्यात आली आहे.पाच तालुक्यात शिल्लक राहिला निधीजिल्ह्यात सहा तालुक्यांमध्ये गारपीट झाली होती. या गारपीटीची पंचनामे केल्यानंतर सहाही तालुक्यातील गारपीट ग्रस्तांसाठी मदतीची मागणी करण्यात आली. त्यात केवळ जिंतूर तालुक्यात १०० टक्के मदतनिधी वाटप झाला असून सेलू तालुक्यात ३ कोटी ३ लाख ४१ हजार रुपये, सोनपेठ तालुक्यात १ कोटी ५८ लाख ५ हजार रुपये, गंगाखेड ११ कोटी ५० लाख ९७ हजार, पालम तालुक्यातून १३ कोटी ९९ लाख ९६ हजार तर पूर्णा तालुक्यातून २ कोटी १२ लाख ४३ हजार रुपयांचा निधी शिल्लक राहिल्याने तो शासन दफ्तरी समर्पित करण्यात आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकारFarmerशेतकरी