शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

परभणी : इमारतीविनाच चालतात तीस अंगणवाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:23 IST

अंगणवाडी कार्यकर्तीच्या हाती स्मार्ट फोन देऊन एकीकडे सुधारणा केल्या जात असताना दुसरीकडे तालुक्यातील ३० अंगणवाड्यांना अद्यापही स्वत:च्या इमारती नसल्याची बाब पुढे आली आहे. तर चार अंगणवाड्यांच्या इमारती धोकादायक बनल्याने आता प्रशासन काय पावले उचलते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): अंगणवाडी कार्यकर्तीच्या हाती स्मार्ट फोन देऊन एकीकडे सुधारणा केल्या जात असताना दुसरीकडे तालुक्यातील ३० अंगणवाड्यांना अद्यापही स्वत:च्या इमारती नसल्याची बाब पुढे आली आहे. तर चार अंगणवाड्यांच्या इमारती धोकादायक बनल्याने आता प्रशासन काय पावले उचलते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.राज्य शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागात अंगणवाड्या चालविल्या जातात. गावाच्या लोकसंख्येच्या आधारावर अंगणवाड्यांची संख्या अवलंबून असते. राज्य कुपोषण मुक्त करण्यासाठी शासन अंगणवाड्यांच्या माध्यमातूून विविध योजना राबविते. गरोदर माता, स्तनदा माता आणि पाच वर्षाच्या आतील बालकांना आहार पुरविला जातो. अंगणवाड्यांसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत आहेत. विशेष म्हणजे इमारतींसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला. गावपातळीवर लोकसहभागातून अंगणवाड्यांना आयएसओ नामांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले. आता प्रत्येक अंगणवाडी कार्यकर्तीच्या हातात स्मार्ट फोन उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अंगणवाडीचे सर्व व्यवहार आॅनलाईन होणार असले तरी तालुक्यातील ३० अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती देण्यास मात्र प्रशासन कमी पडले आहे.१० अंगणवाड्या किरायाच्या जागेत४पाथरी तालुक्यात १४२ अंगणवाड्या असून त्यातील २४ अंगणवाड्या मिनी अंगणवाड्या आहेत. ११२ अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारती आहेत. तर १० अंगणवाड्या किरायाच्या जागेत चालविल्या जातात.४२० अंगणवाड्या शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये भरविल्या जातात. तर ३० अंगणवाड्यांना अजूनही स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे या अंगणवाड्यांना इमारत केव्हा मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.मॉडेल लटकले४राज्य शासनाने प्रायोगिक तत्वावर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी २५ अंगणवाड्या मॉडेल बनविण्यासाठी अहवाल मागविला होता. मात्र पुढे त्यात काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे अंगणवाडींचे मॉडेल कागदोपत्री लटकले आहे.पाथरी तालुक्यातील ४ इमारती धोकादायक४तालुक्यातील उमरा, मुदगल, जैतापूरवाडी आणि रेणापूर येथील अंगणवाड्यांच्या इमारतीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. या इमारती धोकादायक बनल्या असून याच इमारतीत अंगणवाडी भरविली जाते. एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकारEducationशिक्षण