शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘जलशुद्धीकरण’चे पंचवीस वर्षानंतर अद्ययावतीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:00 IST

पालिकेला प्राप्त झालेल्या विकास निधीतून जलशुद्धीकरण प्रकल्पाचे अद्ययावतीकरण करण्यात येत असून यामुळे शहरातील नागरिकांना आगामी काळात पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : पालिकेला प्राप्त झालेल्या विकास निधीतून जलशुद्धीकरण प्रकल्पाचे अद्ययावतीकरण करण्यात येत असून यामुळे शहरातील नागरिकांना आगामी काळात पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणार आहे.शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाथरी रस्त्यावर २५ वर्षापूर्वी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पामुळे शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत होते. २० ते २५ वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे अद्यावतीकरण करण्यात आलेले नव्हते. या प्रकल्पाच्या दुरुस्ती आणि आधुनिकीकरणासाठी निधी प्राप्त झाला आहे. २७ डिसेंबरला या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी लागणारी वाळू बदलण्यात आली नव्हती. ही वाळू बदलण्यात येणार आहे. पाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्वी आणि नंतरच्या प्रक्रिया करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री बदलण्यात येणार आहे. नवीन प्लोकलेक्टर बसविण्यात येणार आहे. प्रकल्पांतर्गत ब्रिजचे काम नव्याने करण्यात येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून बंद पडलेली आॅक्सिमॅक्स मशिनसह क्लोरिंग सिलेंडर बदलण्यात येणार आहे. त्यामुळे जलसुध्दीकरण प्रकल्पच अद्ययावत करण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाची रंगरंगोटी करण्यात येणार आहे. शहराची लोकसंख्या ३५ हजारांवर गेली आहे. पाणी शुद्ध मिळावे, अशी मागणी होती. पालिकेकडून आता ही मागणी पूर्ण होणार आहे. पालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे, डॉ.अंकुश लाड, अभियंता शेख अन्वर, बंडू सोरेकर यांनी नुकतीच प्रकल्पाची पाहणी केली आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्ष राणी अंकुश लाड यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी