शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : फळ लागवड योजनेसाठी अडीच कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:55 IST

भाऊसाहेब फुुंडकर फळ लागवड योजना २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राबविण्यात येत आहे़ फळबागांच्या लागवडीसाठी शासकीय अनुदान देण्यात येणार आहे़ त्यासाठी परभणी जिल्ह्याला २ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भाऊसाहेब फुुंडकर फळ लागवड योजना २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राबविण्यात येत आहे़ फळबागांच्या लागवडीसाठी शासकीय अनुदान देण्यात येणार आहे़ त्यासाठी परभणी जिल्ह्याला २ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़परभणी जिल्ह्यात खरीप हंगामात ५ लाख हेक्टर क्षेत्र व रबी हंगामात अडीच लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत पेरणी केली जाते़ परंतु, मागील चार-पाच वर्षांपासून शेतकऱ्यांनी दोन्ही हंगामातील पिकांवर केलेला खर्च उत्पादनातून निघून नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडत आहेत़ त्यामुळे शेतकºयांना खरीप व रबी हंगामातील पेरणीसाठी पैशांची गरज भासते़ त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पेरणीपूर्वी बँकांच्या दारामध्ये पीककर्जासाठी उभा राहतो़ यावर्षीही परिस्थितीमध्ये बदल झालेला नाही़ या परिस्थितीमध्ये बदल करून शेतकºयांनी पारंपारिक पिकांबरोबरच फळ लागवडीकडे वळावे, यासाठी राज्य शासनाने १७ जुलैपासून राज्याचे दिवंगत कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या स्मरणार्थ भाऊसाहेब फुंडकर फळ लागवड योजना अंमलात आणली़या योजनेंतर्गत १८ प्रकारच्या फळबागा अनुदान तत्त्वावर समाविष्ट करण्यात आल्या आहेत़ यामध्ये आंबा, काजू, पेरू, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, सिताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फनस, अंजीर, चिकू (सर्व कलमे) या फळबागांचा समावेश करण्यात आला आहे़ या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांच्या कुटूंबातील उपजिवीका ही केवळ शेतीवर अवलंबून असली पाहिजे असे निकष लावण्यात आले आहेत़ या योजनेस १७ जुलैपासून २१ दिवसांपर्यंत तालुका कृषी अधिकाºयांकडे या योजनेसाठी प्रस्ताव दाखल करणे आवश्यक आहे़ या योजनेतील लाभार्थ्यांना फळबागांच्या लागवडीसाठी २ कोटी ४८ लाख २० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे़अशी लावावी लागणार झाडेभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेतल्यानंतर लाभार्थ्याला आंब्याची प्रतिहेक्टरी १००, काजू २००, पेरू २७७, डाळींब ७४०, संत्रा २७७, नारळ १५०, सिताफळ ४००, आवळा २००, चिंच १००, जांभूळ १००, कोकम २००, फणस १००, अंजीर ७४० व चिकूची १०० झाडे लावावी लागणार आहेत़ यासाठी ३ टप्प्यात अनुदानाची रक्कम मिळणार आहे़ यामध्ये पहिल्या टप्प्यात ५० टक्के, दुसरा ३० टक्के व तिसरा २० टक्क्यानुसार अनुदान देण्यात येणार आहे़ हे अनुदान लाभार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीfundsनिधी