शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : उच्चदाब प्रणाली योजनेत कंत्राटदारांना २६ नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 23:51 IST

उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या कृषीपंपासह घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी ८६ कोटींची कामे मंजूर करण्यात आली; परंतु, या योजनेत मुदत संपूनही कामे पूर्ण न झाल्याने महावितरण कंपनीने २१ कंत्राटदारांना अमाधानकारक कामे असल्याच्या कारणावरून २६ नोटिसा पाठविल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या कृषीपंपासह घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी ८६ कोटींची कामे मंजूर करण्यात आली; परंतु, या योजनेत मुदत संपूनही कामे पूर्ण न झाल्याने महावितरण कंपनीने २१ कंत्राटदारांना अमाधानकारक कामे असल्याच्या कारणावरून २६ नोटिसा पाठविल्या आहेत.जिल्ह्यात ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरुन वीज जोडणीसाठी प्रलंबित असणाºया कृषी पंपाच्या लाभार्थ्यांसाठी महावितरणने उच्चदाब वीज वितरण प्रणाली अंमलात आणली होती. या योजनेत ३ हजार ९६३ कृषीपंप धारकांचा समावेश करण्यात आला. या योजनेत ८६ कोटी रुपयांचा खर्च करुन ३ हजार ४८२ स्वतंत्र रोहित्रे व ७४१ किलोमीटर उच्चदाब वाहिनीचे काम समाविष्ट करण्यात आले. ही कामे करण्यासाठी सप्टेंबर २०१८ मध्ये २१ कंत्राटदारांना कार्यारंभ आदेशही देण्यात आले. या योजनेतील कामे ३१ डिसेंबर २०१९ या एक वर्षाच्या कालावधीत संबंधित कंत्राटदाराने पूर्ण करणे अपेक्षित होते; परंतु, या कंत्राटदाराने ३ हजार ९६३ कृषीपंपधारकांपैकी १ हजार ४४२ कृषीपंपाना वीज जोडणी देण्याचेच काम पूर्ण केले. ज्याची टक्केवारी ही केवळ ३६.३८ एवढी राहिली आहे. जानेवारी २०२० अखेरपर्यंत परभणी जिल्ह्यात केवळ १ हजार ७०५ वीज जोडण्या पूर्ण करण्यात आल्या असून २ हजार २७८ कामेही प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे या योजनेतील कंत्राटदारांकडून संथगतीने कामे होत असल्याने लाभार्थी कृषी पंपधारकांनी आ. डॉ. राहुल पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या. या तक्रारीच्या अनुषंगाने आ. डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेत महावितरण कंपनीच्या उच्चदाब प्रणालीअंतर्गत कामे अपूर्ण असून, लाभार्थी शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणने या योजनेतील कामाची चौकशी केली असून ज्या कंत्राटदारांच्या कामाची प्रगती अमसमाधानकारक आहे, अशा २१ कंत्राटदारांना आतापर्यत कामांमध्ये सुधारणा कराव्यात यासाठी २६ नोटिसा बजावल्याचे उतर दिले आहे. त्यामुळे या योजनेतील कामांचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.उपकंत्राटदारांचा भरणा झाल्यानेच कामे खोळंबली४राज्य शासन व उर्जा विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ३ हजार ९६३ कृषीपंप धारकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी ८६ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या. यामध्ये ३ हजार ९६३ स्वतंत्र कृषीपंप उभारणे, ७४१ किलोमीटर उच्चदाब वाहिनी अंथरणे ही कामे समाविष्ट करण्यात आली होती; परंतु, या कामासाठी महावितरण कंपनीने २१ कंत्राटदारांचा समावेश करुन त्यांना कार्यारंभ आदेश दिले; परंतु, या २१ कंत्राटदारांमध्ये बहुतांश कंत्राटदार हे उप कंत्राटदार असल्याने कामाच्या दर्जाबाबत सातत्य राखण्यात आले नाही. विशेष म्हणजे या योजनेतील कामे वेळेत पूर्ण करण्याकडेही या कंत्राटदारांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या योजनेतील कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत. याचा कृषीपंपधारकांना बसला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण