मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत जिल्ह्यात बसविण्यात येत असलेल्या स्वतंत्र विद्युत रोहित्राचा भार पेलण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून उच्चदाब प्रणाली योजना २ अंमलात आणली आहे. या योजनेंतर्गत १२ कोटी रुपयांची कामे होणार असून १० डिसेंबर २०१९ रोजी या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या पाण्याचा शेती सिंचनासाठी उपयोग व्हावा, यासाठी वीज वितरण कंपनीने सप्टेंबर २०१८ मध्ये उच्चदाब प्रणाली योजना १ अंमलात आणली. या योजनेंतर्गत ८६ कोटी रुपये मंजूर करुन जिल्ह्यातील जवळपास साडेपाच हजार शेतकऱ्यांना स्वतंत्र विद्युत रोहित्र बसविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. या योजनेत बसविण्यात येणाºया स्वतंत्र विद्युत रोहित्रांचा भार पेलण्यासाठी वीज वितरण कंपनीने १० डिसेंबर २०१९ रोजी उच्चदाब प्रणाली योजना २ अंमलात आणली. या योजनेंतर्गत १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीमधून पालम तालुक्यातील चाटोरी येथे ३३ केव्हीचे एक उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर परभणी तालुक्यातील दैठणा, सिंगणापूर, बोबडे टाकळी व पालम तालुक्यातील फरकंडा येथे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफार्मर बसविण्यात येणार आहे. जिंतूर तालुक्यातील आडगाव, कोलपा येथे ११ केव्हीचे फिडर बे बसविण्यात येणार आहे. या कामासाठी प्रगती मल्टीसर्व्हिसेस या कंपनीची निवड केली आहे. कामांसाठी ५ मार्च २०२१ पर्यंतची मुदत दिली आहे. मुदतीत कामे पूर्ण झाल्यास ९२ हजार कृषीपंपधारकांना सुरळीत वीज पुरवठा होणार असून त्याचा लाभ शेतातील पिकांच्या सिंचनासाठी होणार आहे.एचव्हीडीएस योजना १ चा बोजवारा४जिल्ह्यातील जवळपास साडेपाच हजार कृषीपंपधारकांना सिंचनासाठी सुरळीत व अखंडित वीज पुरवठा व्हावा, यासाठी राज्य शासन व वीज वितरण कंपनीने १५ सप्टेंबर २०१८ रोजी ८६ कोटी रुपये मंजूर करुन उच्चदाब प्रणाली योजना (एचव्हीडीएस) अंमलात आणली.४या अंतर्गत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत साडेपाच हजार शेतकºयांना स्वतंत्र विद्युत रोहित्र मिळणार होता; परंतु, या योजनेत उपकंत्राटदारांचा जास्तीत जास्त भरणा झाला. त्यामुळे मुदत संपुनही आतापर्यंत केवळ १८०० विद्युत रोहित्र उभारण्यात आले आहेत.४महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळेच या योजनेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे नांदेड येथील मुख्य अभियंता दत्तराव पाडळकर व परभणी येथील अधीक्षक अभियंता अन्नपूर्वे यांनी किमान उच्चदाब प्रणाली योजना २ मधील कामे तरी वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कृषीपंपधारकांतून होत आहे.अधिकाºयांच्या दुर्लक्षाचा फटका४परभणी जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीची वीज पुरवठा करण्याची वितरण व्यवस्था सुरळीत व्हावी. त्याच बरोबर औद्योगिक, घरगुती, कृषीपंपधारक, वाणिज्य या घटकातील प्रत्येक वीज ग्राहकाला सुरळीत वीज पुरवठा व्हावा, यासाठी मागील पाच वर्षात कोट्यवधी रुपयांच्या योजना राज्य शासन व वीज वितरण कंपनीने मंजूर केल्या; परंतु, परभणी येथील वरिष्ठ अधिकाºयांच्या दुर्लक्षाचा या योजनांना मोठा फटका बसला आहे.४यामध्ये दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना, इन्फ्रा १, इन्फ्रा २, उच्चदाब प्रणाली योजना १ या योजनेतील कामे मुदतीत पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही जिल्ह्यातील अधिकाºयांच्या व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.
परभणी : उच्चदाब योजनेंतर्गत १२ कोटींची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 23:38 IST