शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : १६ रॉकेल विक्रेत्यांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:29 IST

केरोसीन वाटपात अनियमितता केल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील १६ रॉकेल विक्रेता दुकानदारांचे किरकोळ विक्री परवाने जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशनी पगारे यांनी निलंबित केले आहेत. १० डिसेंबर रोजी या संदर्भातील कारवाईचे आदेश संबंधितांना देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केरोसीन वाटपात अनियमितता केल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील १६ रॉकेल विक्रेता दुकानदारांचे किरकोळ विक्री परवाने जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशनी पगारे यांनी निलंबित केले आहेत. १० डिसेंबर रोजी या संदर्भातील कारवाईचे आदेश संबंधितांना देण्यात आले.जिंतूर तालुक्यातील केरोसीन वाटपातील अनियमिमतेप्रकरणी शामसुंदर सुखदेव सारडा यांनी राज्य शासनासह जिल्हाधिकाऱ्यांकडे ३१ मे रोजी तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या वतीने १० आॅक्टोबर रोजी किरकोळ रॉकेल विक्रेता रेशन दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर संबंधित दुकानदारांनी याच महिन्यात आपले खुलासे जिंतूर तहसील कार्यालयामार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे सादर केले होते.यातील अनेकांचे खुलासे समाधानकारक नसल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशनी पगारे यांनी १६ रेशन दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला. तसेच संबंधित विक्रेत्यांच्या संपूर्ण अनामत रक्कमा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये चारठाणा येथील २, सोस येथील २ तसेच भांबरी, जोगवाडा, बेलखेडा, अकोली, पिंपरी खु., कान्हा, कोलदांडी, हलविरा, पिंपराळा, कवडा तांडा, रायखेडा, पांढरगळा येथील रेशन दुकानदारांना समावेश आहे. ज्या रेशन दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, त्या गावांमध्ये रॉकेल वितरणाची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश जिंतूर येथील तहसीलदारांना देण्यात आले आहेत.या संदर्भातील कारवाई पुर्ण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशनी पगारे यांनी जिंतूर तहसीलदारांना दिले आहेत. पुरवठा विभागाच्या या कारवाईमुळे रेशनदुकानातून रॉकेल विक्री करणाºया दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.रॉकेल वितरणात अनियमितताज्या १६ रॉकेल विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, त्यातील काही विक्रेत्यांनी रॉकेल वितरणात अनियमितता केल्याचा प्रकार चालू वर्षात जानेवारी २०१८ पासून समोर आला होता. साठा व वाटप नोंद वही तपासणीच्या वेळी उपलब्ध करुन न देणे, केरोसीन आवक- विक्री व शिलकीचा अहवाल तहसील कार्यालयास सादर न करणे, नोंदवहीत खाडाखोड करणे, केरोसीन विक्री नोंदवहीवर काही शिधापत्रिका धारकांच्या स्वाक्षºया न घेणे, केरोसीन परवाना प्रत उपलब्ध करुन न देणे आदी विविध कारणांनी या विक्रेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे या संदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTahasildarतहसीलदार