शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : लोकन्यायालयात १६९७ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:18 IST

येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने १७ मार्च रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये १६९७ प्रकरणांत तडजोड करून ही प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्यात ९ कोटी ४८ लाख ८८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने १७ मार्च रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये १६९७ प्रकरणांत तडजोड करून ही प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्यात ९ कोटी ४८ लाख ८८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली़परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये रविवारी राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली़ परभणी जिल्हा न्यायालयात सकाळी १०़३० वाजता प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी फलके यांच्या हस्ते लोक न्यायालयाचे उद्घाटन झाले़ यावेळी जिल्हा न्यायाधीश ए़एम़ पाटील, वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड़ मनोज कुंभारीकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव शेख अकबर शेख जाफर यांनी प्रास्ताविकात लोकन्यायालयातील पॅनल विषयी माहिती दिली़ अध्यक्षीय समारोप करताना प्रमुख जिल्हा सत्र न्या़ उर्मिला जोशी म्हणाल्या, जास्तीत जास्त प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवून ती निकाली काढावीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन कुलकर्णी यांनी केले़ न्या़ एस़एस़ खिरापते यांनी आभार मानले़ या लोकन्यायालयामध्ये फौजदारी, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, वीज व पाणी आकार प्रकरणे, वेतन व भत्त्यांची सेवाविषयक प्रकरणे, महसूल, दिवाणी आणि बँकेची वसुली वादपूर्व दाखल प्रकरणे ठेवण्यात आली होती़ त्यात दिवाणी व फौजदारी स्वरुपाच्या ५४० प्रकरणांमध्ये तडजोड झाली़ त्यातून ६ कोटी ८२ लाख ५६ हजार १ रुपयांची वसुली झाली़ तसेच ११५७ वाद दाखल पूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात २ कोटी ६६ लाख ३२ हजार ६८६ रुपये वसूल झाले़ दोन्ही मिळून १६९७ प्रकरणे निकाली निघाली असून, ९ कोटी ४८ लाख ८८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती न्यायालयाच्या सूत्राने दिली़पाथरीत २८ प्रकरणे निकालीपाथरी तालुका विधि सेवा समितीच्या वतीने आयोजित लोक न्यायालयात २८ प्रकरणे निकाली काढण्यात आली़ पाथरी न्यायालयात आयोजित या लोक न्यायालयास बँक व्यवस्थापक दास, उपशाखा व्यवस्थापक डी़एम़ गोयले, वसुली प्रतिनिधी प्रकाश मोरे यांची उपस्थिती होती़ या लोकन्यायालयात भारतीय स्टेट बँक कृषी शाखेने ४० वादपूर्व प्रकरणे ठेवली होती़ त्यापैकी २८ प्रकरणांमध्ये तडजोड झाली़ त्यात ५१ लाख ४२ हजार रुपयांपैकी २६ लाख ९२ हजार रुपये जमा करण्यात आले़ तडजोड प्रकरणे ३१ मार्चपर्यंत पूर्ण केली असून, कृषी क्षेत्रातील कर्ज प्रकरणात तडजोड झाल्यानंतर लाभधारकास नवीन कर्ज दिले जाईल, असे शाखा व्यवस्थापक दास यांनी सांगितले़

टॅग्स :parabhaniपरभणीconsumerग्राहक