शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :१३ गावांना कायमस्वरुपी मिळणार पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:10 IST

तालुक्यातील १३ गावांना राष्टÑीय पेयजल योजनेतून कायमस्वरुपी पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेची कामे मार्चपूर्वी सुरू होणे अपेक्षित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): तालुक्यातील १३ गावांना राष्टÑीय पेयजल योजनेतून कायमस्वरुपी पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेची कामे मार्चपूर्वी सुरू होणे अपेक्षित आहे.तालुक्यातील अनेक गावांमध्ये कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना नाहीत. त्यामुळे या गावांना हातपंप व उन्हाळ्यात पाणी स्त्रोत अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येतो. काही गावांतील नळ योजना जुनाट झाल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा करताना ग्रामपंचायतींना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाागाने गतवर्षी ३७ गावांना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून कायमस्वरुपी पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठवून निधी मंजूर करावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार ३७ पैकी १३ गावांचा या योजनेत समावेश करून शासनाने निधी मंजूर केला आहे. कायमस्वरुपी नळ योजनेसाठी ब्राह्मणगाव ३५ लाख, डुगरा ४० लाख, साळेगाव ६५ लाख, तळतुंबा ५५ लाख, ब्रह्मवाडी ५५ लाख, खुपसा ५० लाख, खेर्डा ६० लाख, खैरी ५५ लाख, लाडनांद्रा ५० लाख, झोडगाव ५० लाख, कवडधन १० लाख, निपानी टाकळी ८५ लाख व सोन्ना ६० लाख या प्रमाणे निधी मंजूर करण्यात आला आहे. कायमस्वरुपी पाणी असलेल्या स्त्रोतामधून गावांना पाणीपुरवठा कसा करता येईल, या संदर्भात भूजल विभागाकडून पाहणी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.नदीपात्रात विहीर घेण्यास प्राधान्य४राष्टÑीय ग्रामीण पेयजल योजनेतून कायमस्वरुपी नळ योजना करण्यासाठी दुधना नदीकाठावरील अनेक गावांना निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये ब्राह्मणगाव, डुगरा, ब्रह्मवाकडी, खुपसा, खेर्डा, टाकळी, सोन्ना या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी दुधना नदीपात्रात विहीर खोदल्यास गावांना बारमाही पाणी मिळू शकते. करपरा नदीकाठावरील गावांनाही योजनेतून पाणी मिळू शकेल.कामाचा दर्जा सुधारणे आवश्यक४यापूर्वीही अनेक गावांत कायमस्वरुपी नळ योजना करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला होता;परंतु, अनेक गावातील योजनेची कामे दर्जेदार न झाल्याने या योजना कुचकामी ठरून शासनाचा निधी पाण्यात गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे या योजनेची कामे दर्जेदार केल्यास योजनेत समावेश असलेल्या गावांचा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी