शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सहकारी संस्थांसाठी १२ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:57 IST

सहकारी संस्थांच्या व्यावसाय, प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या अटल अर्थसहाय्य योजनेंतर्गत जिल्ह्याला १२ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ या संदर्भातील आदेश सहकार व पणन विभागाने नुकतेच काढले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सहकारी संस्थांच्या व्यावसाय, प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या अटल अर्थसहाय्य योजनेंतर्गत जिल्ह्याला १२ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ या संदर्भातील आदेश सहकार व पणन विभागाने नुकतेच काढले आहेत़राज्यात सहकारी संस्थांचे नवीन प्रकल्प सुरू होण्याची प्रक्रिया मंदावली आहे़ त्यामुळे या सहकारी संस्थांना सक्षम करण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात अटल महापणन विकास अभियानांतर्गत ५ हजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणाची कार्यवाही २०१६ पासून सुरू करण्यात आली आहे़ त्या अंतर्गतच सहकारी संस्थांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती सुरू करण्याच्या दृष्टीकोणातून अटल अर्थसहाय्य योजना राज्य शासनाने सुरू केली आहे़ ग्रामीण विकासास सहाय्यभूत ठरणाऱ्या, सहकारी संस्थांच्या कृषी व कृषी पूरक उद्योगास प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने ही योजना सुरू करण्यात आली आहे़या योजनेंतर्गत राज्यातील ३४ जिल्ह्यांना ४९० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांसाठी १२ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे़या योजनेंतर्गत शेतकºयांच्या शेतमालावर प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया करून मूल्य संवर्धन करणे, शेतमाल उत्पादनातून शेतकºयांचा नफा वाढविण्यासाठी तसेच शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सहकारी संस्थांनी त्या त्या भागात शेतमालावर प्रक्रिया व विक्री करण्यास प्रोत्साहन देणे, शेतकरी ते ग्राहक यामध्ये असणारी मूल्य साखळी कमी करून शेतकºयांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी सहकारी संस्थांमार्फत विविध प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, जागतिक बाजारपेठेत कृषी व पूरक उद्योगास वाव असलेले उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे आदी बाबींतर्गत कामे करण्याची उद्दिष्टे अटल अर्थसहाय्य योजनेंतर्गत ठरवून देण्यात आली आहेत़या योजनेंतर्गत ४० लाख रुपयांच्या कमाल मर्यादेपर्यंत संबंधित सहकारी संस्थांना प्रकल्प उभारण्यासाठी मदत करण्यात येणार असून, यासाठीच्या प्रकल्पांची नावेही सहकार विभागाने दिली आहेत़या योजनेंतर्गत मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यास ६ कोटी ९० लाख, उस्मानाबाद जिल्ह्यास ११ कोटी ४ लाख, नांदेड जिल्ह्यास २२ कोटी ८ लाख, जालना जिल्ह्यास ११ कोटी ४ लाख, लातूर जिल्ह्यास १३ कोटी ८० लाख, बीड जिल्ह्यास १५ कोटी ८ लाख आणि औरंगाबाद जिल्ह्यास १२ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधी