शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : स्मार्ट गावांसाठी ११ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:09 IST

राज्य शासनाने सुरु केलेल्या स्मार्ट गाव योजनेअंतर्गत तालुका स्मार्ट ग्रामसाठी पुरस्कार रक्कम म्हणून परभणी जिल्हा परिषदेला ११ लाख ३४ हजार ८४६ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाने सुरु केलेल्या स्मार्ट गाव योजनेअंतर्गत तालुका स्मार्ट ग्रामसाठी पुरस्कार रक्कम म्हणून परभणी जिल्हा परिषदेला ११ लाख ३४ हजार ८४६ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी पर्यावरण संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृद्ध व संपन्न गावांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने २०१०-११ पासून पर्यावरण संतुलित ग्राम योजना राबविण्यात येत होती. या योजनेचे रुपांतर आता स्मार्ट ग्राम योजनेत करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक तालुक्यातील १ आणि प्रत्येक जिल्ह्यातून एका ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम म्हणून निवड करण्यात येते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी २०१७-१८ मध्ये ५३ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम अर्थसंकल्पात तरतूद केली होती. एप्रिल- मे महिन्यात स्मार्ट ग्राम योजनेसाठी एकूण तरतुदीपैकी ८ कोटी ९६ लाख ६७ हजार रुपये एवढी रक्कम वितरित करण्यात आली. त्यातून प्रति जिल्हा ३१ लाख या प्रमाणे जिल्हा परिषदांना निधी वितरित करण्यात आला होता. तसेच तालुकास्तरीय स्मार्ट ग्रामसाठी प्रत्येक गावांना पारितोषिक म्हणून १० लाख रुपयांचा निधीही वितरित झाला होता. या निधीतून राज्यातील ३५० तालुक्यांमधील स्मार्ट ग्राम निवड झालेल्या ग्रामपंचायतींना १ मे २०१७ रोजी प्रमाणपत्र व पारितोषिक वितरित करण्यात आले. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार मार्च २०१८ हा अखेर ४ कोटी ४१ लाख ३३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध असल्याने राज्यातील स्मार्ट गाव म्हणून निवड झालेल्या गावांना १ कोटी २६ लाख ९४ हजार रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या संदर्भातील शासनादेश ग्रामविकास विभागाने नुकताच निर्गमित केला आहे. या शासन आदेशानुसार परभणी जिल्हा परिषदेला ११ लाख ३४ हजार ८४६ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.९ गावांना होणार निधीचे वितरणस्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातून १ ग्रामपंचायत स्मार्ट ग्राम म्हणून निवडली जाणार आहे. जिल्ह्यात ९ तालुके असून या तालुक्यांमधील प्रत्येकी १ या प्रमाणे ९ गावांना उपलब्ध झालेला निधी वितरित होणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावाने हा निधी प्राप्त झाला आहे.मुलींच्या वसतिगृहासाठी ११.७० लाख रुपयांचा निधीआर्थिक वर्ष संपले असून मागील आर्थिक वर्षातील निधीचे वितरण राज्य शासनाकडून केले जात आहे. त्यानुसार केंद्र पुरस्कृत बहुक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातील शहर विकास कामांच्या अंमलबजावणीअंतर्गत मुलींच्या वसतिगृहासाठी ११ लाख ७० हजार रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने हा आदेश काढला आहे.१२ व्या पंचवार्षिक योजनेत केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने परभणी शहरात मुलींसाठी १०० प्रवेश क्षमतेच्या वसतिगृहाला मंजुरी दिली होती. त्यासाठी १ कोटी ५९ लाख ५४ हजार रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. या अंतर्गत केंद्र शासनाचा १ कोटी ३३ लाख ७४ हजार रुपयांचा हिस्साही जिल्हाधिकाºयांना वर्ग करण्यात आला आहे. मात्र राज्य शासनाचा हिस्सा वितरित होणे बाकी होते.राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने नुकतीच ११ लाख ७० हजार रुपयांची रक्कम जिल्हाधिकाºयांना वितरित केली आहे. या रक्कमेतून मोकळ्या जागेवरील छतासाठी प्रोफलेक्ससीट बसविण्यासाठी १ लाख ७० हजार रुपये आणि वसतिगृह इमारत बांधकाम या कामासाठी राज्याची रक्कम म्हणून १० लाख रुपये असे ११ लाख ७० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रमांतर्गत शहराला हा निधी मिळाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani z pपरभणी जिल्हा परिषद