शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : १०६ रोजंदारी कामगार सेवेत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:56 IST

येथील महानगरपालिकेत २७ मार्च २००० पर्यंत कार्यरत असलेल्या १०६ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आता महापालिकेत एकही रोजंदारी कामगार शिल्लक राहिलेला नाही. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांचा प्रश्न निकाली निघाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेत २७ मार्च २००० पर्यंत कार्यरत असलेल्या १०६ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आता महापालिकेत एकही रोजंदारी कामगार शिल्लक राहिलेला नाही. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांचा प्रश्न निकाली निघाला आहे.शहर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये रोजंदारी तत्त्वावर कामगारांना सेवेत घेतले होते. या कर्मचाºयांना मनपातून स्थानिक स्तरावर मोबदला अदा केला जात होता. या कामगारांना सेवेत कायम करावे, अशी मागणी कामगार संघटनांनी मागील काही वर्षांपासून केली होती. या मागणीची दखल घेऊन तत्कालीन महापौर प्रताप देशमुख, संगीता वडकर यांच्या कार्यकाळात महापालिकेतील १३६ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तत्कालीन मनपा आयुक्त राहुल रेखावार यांच्या कार्यकाळात हा प्रस्ताव पठाविण्यात आला होता. दरम्यान, या प्रस्तावापैकी ३५ कामगारांना यापूर्वीच सेवेत कायम करण्यात आले होते. उर्वरित कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घ्यावा, यासाठी महापौर मीनाताई वरपूडकर, सभागृहनेते भगवान वाघमार, आयुक्त रमेश पवार यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैैैसकर यांच्याकडे पाठपुरावा केला.परभणीतून दाखल झालेल्या प्रस्तावानंतर राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव मागविण्यात आला. हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील १४०० रोजंदारी कामगारांना कायम करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे, या निर्णयामुळे परभणी महापालिकेतील सर्वाधिक १०६ कामगार सेवेत कायम झाले आहेत.४रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करावे, या मागणीसाठी कामगार संघटनेचे अध्यक्ष के.के. आंधळे, राज्याध्यक्ष डी.पी. शिंदे, सचिव आनंद मोरे, महानगर अध्यक्ष बाबाराव आघाव, अभिजीत कुलकर्णी, सतीश राऊत, अण्णासाहेब देशमुख, रामेश्वर कुलकर्णी, उमेश जाधव, मावई, प्रकाश गायकवाड आदींनी पाठपुरावा केला.४या निर्णयामुळे महापालिकेंतर्गत रोजंदारी तत्त्वावर काम करणाºया शिक्षक, सेविका, शिपाई, लिपिक, वैद्यकीय अधिकारी या पदावरील कर्मचाºयांना लाभ झाला आहे़ त्यामुळे आता महापालिकेत एकही रोजंदारी कर्मचारी शिल्लक राहिला नसल्याचे कर्मचारी संघटनेने सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाEmployeeकर्मचारी