शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : १० वाळूघाट उपशासाठी झाले खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:24 IST

जिल्ह्यातील १० वाळूघाटांचे लिलाव पूर्ण झाले असून या घाटांवर आता अधिकृत वाळू उपसा होणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लवकरच या वाळूघाटांमधून वाळू उपशाला सुरुवात होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यातील १० वाळूघाटांचे लिलाव पूर्ण झाले असून या घाटांवर आता अधिकृत वाळू उपसा होणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लवकरच या वाळूघाटांमधून वाळू उपशाला सुरुवात होईल.जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाळूघाटाचे लिलाव रखडल्याने वाळूची कृत्रिम टंचाई निर्माण झाली होती. परिणामी बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिक कचाट्यात सापडले होते. दुष्काळी परिस्थिती आणि त्यात वाळूअभावी बांधकामे ठप्प असल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो मजुरांनी रोजीरोटीसाठी इतर व्यवसाय सुरु केले. तसेच वाळू मिळत नसल्याने शासकीय योजनांची कामेही ठप्प पडली होती. घरकुल बांधकामांसह इतर कामांवर वाळूचा मोठा परिणाम झाला. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने १५ वाळूघाट लिलावासाठी ठेवले होते. त्यापैकी १० वाळूघाटांचे लिलाव पूर्ण झाले असून कंत्राटदाराने या वाळूघाटाची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केल्यानंतर वाळूचा अधिकृत उपसा सुरु केला जाणार आहे.जिल्हा प्रशासनाने वाळू घाटांसाठी निविदा प्रक्रिया राबविली. त्यात दुस्सलगाव येथील वाळूघाट ६४ लाख ८४ हजार ५८४ रुपयांना जय नृसिंह बिल्डींग मटेरियल यांना सुटला आहे. काजळा रोहिणा हा वाळूघाट ३५ हजार ३१ हजार ४० रुपयांचा श्री साई भुसार दुकान या कंत्राटदारास मिळाला आहे. मुद्गल येथील वाळू घाट १ कोटी १३ लाख १८ हजार ४२८ रुपयांना शेख बिल्डींग मटेरियल यांनी घेतला आहे.पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या येथील वाळू घाट ८१ लाख रुपयांना साई अर्थमूव्हर्स अ‍ॅण्ड बोअरवेल बिल्डींग या कंत्राटदारास, चिंचटाकळी येथील वाळूघाट ६१ लाख १ हजार १०० रुपयांना कृष्णा त्र्यंबक कचरे यांना मिळाला आहे. गुंजचा वाळू घाट ६४ लाख ९१ हजार रुपयांना अग्रवाल ट्रेडिंग कंपनीला, रावराजूर येथील वाळू घाट विष्णू शंकर नारणवार यांना १ कोटी १ लाख ९५ हजार रुपयांना मिळाला आहे. तर कुंभारी येथील वाळू घाट शेख चाँद शेख हबीब यांना ६० लाख ६२ हजार ६०० रुपयांना मिळाला आहे. वांगी येथील वाळू घाटाचा लिलाव झाला असून हा घाट १ कोटी १४ लाख ६ हजार ५४८ रुपयांना बप्पा श्री कन्स्ट्रक्शनला सुटला आहे. त्याचप्रमाणे मानवत तालुक्यातील पार्डी येथील वाळू घाटाचाही लिलाव झाला असून हा घाट १२ लाख ४० हजार रुपयांना सुटला आहे.जिल्ह्यातील १० वाळू घाटांचे लिलाव पूर्ण झाल्याने या वाळू घाटामधून लवकरच वाळू उपसा होणार असून खुल्या बाजारपेठेत वाळू उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाळूची कृत्रिम टंचाई आहे. वाळू घाटांच्या लिलावामुळे आगामी काळात बांधकाम व्यवसायाला चालना मिळेल, अशी शक्यता आहे.वाळूच्या किंमतीत घट होण्याची शक्यता४वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने खुल्या बाजारातून वाळू गायब झाली होती; परंतु, चोरुन- लपून वाळूची विक्री सुरुच होती. वाळूची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने ० हजार रुपयांना तीन ब्रास वाळू मिळत होती. वाळूचे भाव गगनाला भिडल्याने नागरिक जेरीस आले होते. शिवाय काळ्या बाजारात वाळू खरेदी केल्यानंतर कारवाईचा धसका असल्याने वाळू खरेदीकडेच अनेकांनी पाठ फिरवली होती. दरम्यान, १० वाळू घाटांमधील अधिकृत वाळू उपसा होणार असल्याने वाळूचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. यातून बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.७ कोटींचा महसूल होणार जमा४जिल्ह्यातील १० वाळू घाटांचे लिलाव झाल्याने या माध्यमातून प्रशासनातील तिजोरीमध्ये ७ कोटी ९ लाख ३० हजार ३०० रुपयांचा महसूल जमा होणार आहे. यावर्षी वाळू घाटांचे लिलाव रखडल्याने जिल्हा प्रशासनाला महसूल जमा करताना अडचणींचा सामना करावा लागला. मार्च महिन्याच्या अखेरीस १० घाटांचे लिलाव झाल्याने ७ कोटी रुपयांचा महसूल प्रशासनाला मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या महसुली उत्पादनात वाढ होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग