शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: निराधार योजनेची १ हजार प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:50 IST

आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेची तालुकास्तरावरील समिती गठित होत नसल्याने १ हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. ९ महिन्यांपासून या संबंधी एक ही बैठक न झाल्याने या प्रकरणाचा निपटारा होत नाही. यामुळे वृद्ध निराधार तहसील कार्यालयात खेट्या मारीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेची तालुकास्तरावरील समिती गठित होत नसल्याने १ हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. ९ महिन्यांपासून या संबंधी एक ही बैठक न झाल्याने या प्रकरणाचा निपटारा होत नाही. यामुळे वृद्ध निराधार तहसील कार्यालयात खेट्या मारीत आहेत.सामाजिक न्याय विभागाच्या विशेष योजनेंतर्गत निराधार घटकासाठी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मासिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजना या दोन राज्य सरकारच्या व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा, निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अंपग निवृत्तीवेतन योजना, आणि राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना या योजना केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा ६०० रुपये अनुदान देण्यात येते. योजनेतील लाभार्थ्यांचे प्रस्ताव निवडीसाठी पालकमंत्र्यांच्या शिफारशीने तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात येते.आघाडी सरकारच्या काळात समिती स्थापन झाली होती. विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्ता परिवर्तन होऊन भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. सरकारला ५ वर्षे पूर्ण होत असताना संजय गांधी निराधार योजनेची समिती स्थापन झाली नाही.सद्यस्थितीत तहसीलदार डी.डी. फुफाटे यांच्याकडे प्रस्ताव मंजुर करण्याचे अधिकार आहेत. गत वर्षी आॅक्टोबर महिन्यात बैठक घेऊन प्रस्तावाची छाननी करण्यात होती. यानंतर जून अखेरीस जवळपास ८०० प्रस्ताव दाखल झाले आहेत.या आकड्यांवरून हजारांवर प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती मिळत आहे. समिती स्थापन होत नसल्याने निराधारांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. समिती स्थापनेची वाट न बघता तहसीलदारांनी आपल्या अधिकारात लवकरात लवकर बैठक घेऊन या प्रकरणाचा निपटारा करण्याची मागणी निराधार वृद्धांतून केली जात आहे.निराधारांवर उपासमारीची वेळ४केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजना या दोन राज्य सरकारच्या व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा, निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अंपग निवृत्तीवेतन योजना, आणि राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा ६०० रुपये अनुदान देण्यात येते.४या अनुदानावर निराधार महिन्याची गुजराण करतात. मात्र मागील काही वर्षापासून या अनुदानासाठी निराधार वृद्ध तहसील प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करीत आहेत; परंतु, या प्रस्तावावर वर्षानुवर्षे कोणतीच कार्यवाही होत नसल्याने विविध योजनेतील निराधारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.लोकसभा, नगरपालिका, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बैठकीला विलंब झाला आहे. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या प्रकरणाचा लवकरच बैठक घेऊन निपटारा करुन पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येईल.- डी डी फुफाटे, तहसीलदार, मानवत

टॅग्स :parabhaniपरभणीTahasildarतहसीलदार