- रेवणअप्पा साळेगावकर सेलू (परभणी) : नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी रिक्त प्रशासकीय पदे भरण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून ६ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी आदेशात सेलू नगरपरिषद मुख्याधिकारीपदी त्र्यंबक कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या आदेशामध्ये निवडणूक प्रक्रियेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सेलू नगरपरिषद मुख्याधिकारी ( गट ब) पदी त्र्यंबक कांबळे यांच्या नियुक्तीचे आदेश उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांच्या सहीने निघाले आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे निवडणूक व्यवस्थापन, मतदान केंद्रांची आखणी, दुबार मतदार तसेच निवडणूक संबंधित इतर कार्यवाहीस चालना मिळणार आहे. कांबळे यापूर्वी परळी नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. येथे त्यांनी उल्लेखनीय कामकाज केले असून आता कांबळे यांचे सेलू नगर परिषदेत प्रशासकीय कसब दिसून येणार आहे.
दरम्यान, या आदेशामुळे प्रभारी मुख्याधिकारी तुकाराम कदम यांना आता मुळ आस्थापनेवर परतावे लागणार आहे. कर्मचारी अस्थापना बदली, कचरा डेपो, यासह खाजगी जागेवर नगर परिषद मालकीची पाटी लावणे आदि वादग्रस्त घटना घडल्याने कदम यांकहा प्रभारी कार्यकाळ चर्चेत राहिला.
Web Summary : Tryambak Kamble is appointed as Chief Officer in Selu Nagar Parishad by state government order. This facilitates smooth election processes. Former Chief Officer Tukaram Kadam will return to his original post.
Web Summary : त्र्यंबक कांबले राज्य सरकार के आदेशानुसार सेलू नगर परिषद के मुख्य अधिकारी नियुक्त हुए। इससे सुचारू चुनाव प्रक्रिया में मदद मिलेगी। पूर्व मुख्य अधिकारी तुकाराम कदम अपने मूल पद पर लौटेंगे।